अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
महाराजांच्या जहागिरीतून...पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले
- लेखक : संदीप तापकीर
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : ७ फेब्रुवारी, २०२२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २८०
- किंमत : ₹३९५.००
- आयएसबीएन : 9789390869152
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
एखाद्या शिवप्रेमी दुर्गभटक्याने आपल्या बॅकपॅकमध्ये इतिहास अभ्यासक संदीप भानुदास तापकीर यांचे हे पुस्तक टाकले, तर तो बिनदिक्कत सलग दोन महिने या शाहजीराजांच्या सुपे परगण्यातील पुणे जहागिरीत भटकू शकतो. पुस्तकात उल्लेख केलेले २९ किल्ले डोळसपणे पाहू शकतो; कारण या पुस्तकात नकाशारूपात जसा भूगोल आहे, तसा प्रत्येक किल्ल्याचा इतिहासदेखील आहे. मुक्काम कुठे करायचा, आसपास काय पाहण्यासारखं आहे, किल्ल्यावर पाणी आहे की नाही, कुठून एसटी किंवा बस पकडायची, किलोमीटर किती, समुद्रसपाटीपासून किल्ला किती उंचीवर आहे, बालेकिल्ल्याहून आजूबाजूला किती किल्ले दिसतात, असे एक ना अनेक संदर्भ संदीप तापकीर यांनी दिले आहेत. मोगऱ्याच्या जाळीतील सगळी फुलं संपली, असं वाटत असतानाच देदीप्यमान इतिहास सांगणारी, स्फुलिंग चेतवणारी रसरशीत इतिहासफुले संदर्भाच्या प्रत्येक पानाआड आपल्याला अवचित सापडतात. त्यामुळे पुण्यात ट्रेकिंग करणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी हे पुस्तक परफेक्ट असं 'ट्रेकिंग गाईडबुक' आहे.
- 'रहस्य'कार गणेश महादेव
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-