Logo
Logo
Hero
"अमृतातेही पैजा जिंके" असं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले आहे, ती आपली मराठी भाषा म्हणजे अनेक साहित्यालंकारांनी सजलेली समृद्ध खाण आहे. साहित्याच्या विविध प्रकारांत आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने सतत भर घालणारे सरस्वतीपुत्र जितके मराठीला लाभले, तितके फारच थोड्या भाषांना लाभले असतील. अशा या समृद्ध मराठीचा वसा आणि वारसा जगासमोर मांडणारे आपले व्यासपीठ म्हणजे, मराठी साहित्यसृष्टी!
पाचव्या नांदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे येथे जानेवारी २०२७मध्ये होणाऱ्या १००व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे, यासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशात ९९ नांदी संमेलनांचे आयोजन करण्याची संकल्पना करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात पाचवे नांदी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते योगेश सोमण यांनी केले.
लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर येथील कवी संजीव व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, समर्थ युवा फाऊंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य आणि वामसी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या नांदी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक व अनुवादक रवींद्र गुर्जर, वामसी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक मदना केशव रेड्डी, जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी, श्रुतीश्री वडगबाळकर आणि कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी साहित्यविश्वात आपले स्वागत आहे​

लोड करत आहे...

लोड करत आहे...

लोड करत आहे...

लोड करत आहे...

लोकप्रिय पुस्तके

मराठी भाषा, वाचनसंस्कृती आणि साहित्यसंवर्धनाकरता सुरू असेलल्या विविध उपक्रमांबद्दलची माहिती

ताज्या घडामोडी

नवी कोरी पुस्तके

वारंवार विचारले जाणारे प्रश्न