अधिक प्रकाशक शोधा
विश्वकर्मा पब्लिकेशन्स
या प्रकाशकाबद्दल
समस्त मराठी वाचकांसाठी 'सकस साहित्य आणि दर्जेदार पुस्तक निर्मिती' हे ब्रीद सत्यात रुजवण्यासाठी सन २०१३मध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सने मराठी व इंग्रजी पुस्तक प्रकाशन क्षेत्रात पदार्पण केले. मागे वळून पाहताना, आजपर्यंतच्या वाटचालीत अवघ्या आठ वर्षांत आम्ही विविध विषयांना स्पर्श करणारी, अभ्यासपूर्ण व सकस साहित्यमूल्ये असणारी मराठी व इंग्रजी भाषांमधील तीनशेपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. यामुळेच साहित्यक्षेत्रातील जाणकारांनी आमची विशेष दखल घेतली आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आजची कुटुंबव्यवस्थासुद्धा वेगाने बदलत आहे. याच जाणिवेतून 'कुटुंबाला' केंद्रस्थानी ठेवून कुटुंबातील प्रत्यकाचे दैनंदिन जीवन अधिक सुकर व आनंददायी करणारी उपयुक्त पुस्तके 'विश्वकर्मा'ने आजवर केली आहेत. 'सुजाण वाचक' हेच आपले शक्तिस्थळ आम्ही मानले असल्याने वाचकाला अधिक समृद्ध व अद्ययावत साहित्य उपलब्ध करून देणे, ही आमची जबाबदारी आहे, हेही आम्ही प्रांजळपणे कबूल करतो. चरित्र, व्यवस्थापनशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, कथासंग्रह, कादंबरी, आरोग्य, आध्यात्मिक, माहितीपर अशा विषयांवरील पुस्तके प्रकाशित करून, आपले वेगळेपण सिद्ध करून वाचकांच्या पसंतीस आम्ही उतरलो आहोत. त्या-त्या विषयांतील तज्ज्ञ, अभ्यासक व जागतिक पातळीवर गौरवलेल्या लेखकांनी आपले लेखन विश्वकर्माकडे प्रसिद्धीस सोपवले, हा आम्ही आमचा गौरवच समजतो. इंग्रजी भाषेतील गाजलेल्या, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त पुस्तकांचा मराठी भाषेत अनुवाद करून वाचकाला जागतिक साहित्याची ओळख करून देण्याचे काम २ आम्ही यापुढेही असेच अखंड सुरू ठेवणार आहोत. 'विश्वकर्मा'ला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने उत्कृष्ट साहित्यनिर्मिती व पुस्तकनिर्मितीचा महत्त्वपूर्ण पुरस्कार देऊन आमच्या आजवरच्या कार्यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. सकस साहित्य, उच्च दर्जाची निर्मिती व माफक मूल्य यांमुळेच आजवरच्या 5 वाटचालीत राज्यातील सुजाण वाचकांचा आम्हाला कायमच वाढता प्रतिसाद मिळाला आहे. हे पाहून आगामी काळातदेखील साहित्य व प्रकाशन क्षेत्रात अधिक भरीव काम 'विश्वकर्मा'कडून निश्चित घडेल, याची आम्ही शाश्वती देतो
साहित्यप्रकार
या प्रकाशकाची पुस्तके
सर्व पाहा