अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
प्रेमाचं नातं -अखंड व परिपूर्ण नातेसंबंध चिरंतन टिकवण्यासाठीचे ५.५ मार्ग
- लेखक : शुभ विलास
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : २४ फेब्रुवारी, २०२१
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७७३
- किंमत : ₹२४०.००
- आयएसबीएन : 9788195012664
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
प्रेम हे वेदना देणारं असू शकतं. ते नैराश्य देऊ शकतं; पण प्रेम ही माणसाला मिळालेली सर्वांत मौल्यवान देणगी आहे, ज्याची आपण देवाणघेवाण करू शकतो. आपण योग्य जोडीदार कसा निवडावा आणि आयुष्यभरासाठी त्याच्याबरोबरचं नातं कसं टिकवून ठेवावं?
आध्यात्मिक जीवनासंदर्भात मार्गदर्शन करणारे शुभ विलास याबाबत तुम्हाला शाखवचनांमधील सहा छोट्या-छोट्या कथांच्या माध्यमातून मदत करतील. या कथा किंवा गोष्टी साहस आणि एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्या, प्रेमाची पदोपदी परीक्षा देणाऱ्यांच्या, प्रेमींमधील धैर्याची मर्यादा पाहणाऱ्यांच्या आणि निर्व्याज प्रेम, विश्वास, करुणा आणि क्षमाशीलता यांच्या आहेत.
नल आणि दमयंती, कृष्ण आणि रुक्मिणी, शकुंतला आणि दुष्यंत, उदयन आणि वासवदत्ता, सत्यवान आणि सावित्री, द्रौपदी आणि पाच पांडव यांच्याबद्दलच्या गोष्टी आपण बऱ्याचदा ऐकल्या असतील; पण त्या खूप खोलात जाऊन तपशीलवार, सहानुभूतिपूर्ण पद्धतीने समजून घेता आल्या नाहीत.
ते समजून घेण्यासाठी ५.५ मार्गच का आहेत, सहा मार्ग का नाहीत? याचं कारण असं आहे, सहावा मार्ग कधीही वेगळा कलाटणी देऊ शकतो.
खोल दार्शनिक सांसह शक्तिशाली कथा सांगणे, एकत्र करणे - परिपूर्ण प्रेम हे आधुनिक युगातील शाखीय शहाणपणाचा खजिना आहे.
तत्त्वज्ञानपर सत्य खोलवर रंजकपणे सांगणारं 'प्रेमाचं नातं' हे पुस्तक म्हणजे आधुनिक युगातील माहितीचा एक खजिनाच आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-