अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
गौळण -वाङ्गय आणि स्वरूप
- लेखक : रामचंद्र अनंत देखणे
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२१
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३१२
- किंमत : ₹३९९.००
- आयएसबीएन : 9789390869282
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
गोकुळातील श्रीकृष्णाच्या लीला काव्यातून सांगणारा गौळण हा लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. लोकसाहित्यातील गौळणींचे दालन भक्तिभाव व शृंगाररसाने सजलेले आहे. संतांच्या गौळणींमध्ये गोपिकांचे श्रीकृष्णावरील प्रेमाचे आध्यात्मिक रूप दिसते, तर शाहिरांच्या गौळणींमध्ये लौकिक शृंगारभाव व्यक्त झाला आहे. 'कशी जाऊ मी वृंदावना/ मुरली वाजवितो कान्हा' (संत एकनाथ) अशा भक्ती व प्रेम या रसांनी ओथंबलेल्या गौळणी संतांनी लिहिल्या; तर 'सोळा हजारात देखणी/ चांद दिसे जणू दर्पणी/ मीच एक राधा गवळ्याची/ आगे साजणी...(पठ्ठे बापूराव) अशा शृंगार व प्रेमरसांनी युक्त गौळणी शाहिरांनी लिहिल्या. दोन्ही प्रकार वाङ्मयात अमर ठरले आहेत, दोन्हींना रसिकमान्यता मिळाली आहे. भक्ती, प्रेम, अध्यात्म व शृंगार एकत्र गुंफणाऱ्या व पिढ्यानपिढ्या लोकमनावर राज्य करणाऱ्या या लोककलेवर संशोधन करून तिचे रसाळ रूप डॉ. रामचंद्र देखणे यांनी या पुस्तकातून समोर आणले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-