अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
रंगसोहळा
- लेखक : विश्वास रमेश देशपांडे
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : २० जुलै, २०२२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १५८
- किंमत : ₹२२५.००
- आयएसबीएन : 9789390869237
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
खरं तर समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात, घडलेल्या चौगल्या गोष्टींबद्दल लेखन व्हावं, चर्चा व्हावी, ते सर्वांपर्यंत पोहोचार्य यासाठी काही भली माणसे काम करत असतात. त्यापैकी विश्वास देशपडि हे एक आहेत, असे मला वाटतं. स्वताच्या जगण्याकडे तटस्थ दृष्टीने बचणं, आजूबाजूला भेटणाऱ्या लोकांचे निरीक्षण करून त्यांच्या मानवी स्वभावाबद्दल लिहिणं. आपलं जीवन खूप सुंदर आहे. जीवनात सुखदुखाचे, भावभावनांचे अनेक बैंठा आहेत आणि त्या जीवनाचा सोहळा, त्या रंगांचा सोहळा विश्वास देशपडि सर्वांनी अतिशय साध्या, सोप्या भाषेत, खुमासदार शैलीतून मांडलेला आहे. सकारात्मक, रचनात्मक, सर्जनशील, प्रेरणादायी, सुंदर अझै साहित्य निर्माण होणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं हे सुसंस्कृत समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. देशपांडे सर तटस्थपणे स्वतम्च्या जीवनाकडे बघतात, इतरांच्या जीवनाकडे बघतात आणि त्यातून आपले अनुभव अतिशय सोप्या शैलीमधून मांडतात. घटना असो वा व्यक्ती असो ते सहजतेने मांडणे आणि ते इतरांच्या हृदयाला भिडणाऱ्या भाषेत लिहिणे, ही त्यांची खासियत आहे.
विश्वास देशपडि सर्वांसारखे लेखक हे समाजाला अधिक समृद्ध करतात, असे मला वाटतं. आपल्या जीवनातही आनंदाचे, समाधानाचे, कृतार्थतेचे अनेक क्षण येतात आणि मग आपसूकच आपले जीवनही एक रंगसोहळा होऊन जाते, ही जाणीव देशपडि सरांचे लेख वाचताना वेळोवेळी आपल्याला होत राहते.
यजुर्वेद महाजन
दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव
(प्रस्तावनेतून)
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-