Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अष्टदीप -आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्त्वांचा वेध – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अष्टदीप -आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्त्वांचा वेध

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : विश्वास रमेश देशपांडे
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : २० जुलै, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३००
  • किंमत : ₹४२५.००
  • आयएसबीएन : 9789390869305
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

विश्वास देशपांडे चाचे 'अष्टदीप । आठ प्रेरणादाधी भारतरजांच्या व्यक्तिमत्त्वांचा वैध' हे पुस्तक म्हणजे ज्यांचा 'भारतरन' पुरस्कार मिळाला, स्थातील त्यांना भावलेल्या निवडक अशा काही व्यक्तीचे सुबीच पण रसाळ भाषेत केलेले गुणपूजन आहे. ज्याप्रमाणे गुण गाईन आवडी या पुस्तकात पु. ल. देशपांडेंनी त्यांना भावलेल्या काही सर्वाधनि मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या गुणांचे दर्शन घडविले आहे. त्याच जातकुळीच्या विश्वास देशपांडे यांनी काही भारतरत्नविजेत्यांचे कृतज्ञ स्मरण आणि लोकांना खास करून तरुण पिढीला देश-समाजासाठी काही करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने केलेले है गुणसंकीर्तन आहे. एका शब्दात या पुस्तकाचे महत्त्व सांगायचे झाले, तर सदरचे पुस्तक है 'प्रेरणादायी व संस्कारक्षम आहे. झपाट्याने मूल्यविहीन तडजोड, भ्रष्टाचार, धर्मांधता आणि आत्मकेंद्री व चंगळवादी कालखंडात लौकांपुढे झासकरून बाल व तरुण पिढीपुढे आदर्श ठेवले पाहिजेत. एक एक भारतरत्नविजेता हा एकेका क्षेत्रातला तळपता सूर्य आहे. त्यांतील अनेक व्यक्ती आज नाहीत, पण त्यांचे तेज अक्षय आहे व त्यांचं जीवनकार्य निरंतर प्रेरणादायी राहणार आहे. विश्वास देशपांडे यांचे 'अष्टदीप आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्त्वांचा वैध' है पुसतक अशा आठ महान भारतरत्नांचे कार्य कथन करणारे व त्यांच्या आदर्शाचे यथोचित गुणवर्णन करणारे आहे. ते बाल, तरुण व एकूणच वाचकांना प्रेरणादायी व संस्कारक्षम मूल्यवर्धन करणारे वाटेल, अशी माझी आशा नव्हे, तर खात्री आहे. लक्ष्मीकांत देशमुख लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके