Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

क्रांतिसूर्य - यशवंतराव होळकर – पुस्तकाचे मुखपृष्ठ

क्रांतिसूर्य - यशवंतराव होळकर

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : दीपक चैतन्य
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : २४ जुलै, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २२४
  • किंमत : ₹३१५.००
  • आयएसबीएन : 9789390869077
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

क्रांतिसूर्य यशवंतराव होळकर आपल्या नावाप्रमाणे 'यशवंत' तर होतेच; पण मनगटात धमक असलेले 'न भूतो न भविष्यति' असे पराक्रमी चीरही होते. यशवंतराव होळकर हे तत्कालीन हिंदी प्रांतातील महेश्वर (इंदौर) संस्थानचे अनषिभिक्त राजे आणि लोकमान्य शासक होते. ते फ्रान्सचा सम्राट आणि झुंजार योद्धा नेपोलियनच्या समकालीन होते. जे काम इंग्लंडमध्ये इंग्रजांविरुद्ध नेपोलियनने आपल्या तलवारीने केले, तेच काम यशवंतरावांनी हिंदुस्थानात आपल्या शौर्याने आणि स्व-बळाने आपल्या समशेरीच्या सामध्यान केले, त्यामुळेच ते आपल्या हयातीतच 'प्रति शिवाजी' म्हणूनही ओळखले गेले. असे असले तरीही या राजाच्या जीवनकथेला नियत्तीचा करार असल्यासारखी कारुण्याची, निःशब्द करणारी झालरही आहे, जी शेवटी मन प्राण झंकारून टाकते. त्यांच्या पराक्रमामुळे उत्तर हिंदुस्थानात ते आजही 'सुभेदार जसवंतराव हुलकरजी' म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्याबद्दल राजस्थानी कवी जसदान यांनी म्हटलं आहे, 'दिखणी दाखवणी पवन ज्यू ज्यो मत्त आवे जसवंत पसरले उत्तर कांठल फिरंग कल लोपना करंत।' याचा अर्थ, जर दक्षिणेकडून पवनरूपी यशवंतरावांनी इंग्रजांशी सघर्ष केला नसता, तर इंग्रजरूपी काळ्या मेघांनी भयंकर पाऊस पाडून या पृथ्वीवर प्रलय केला असता

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके