अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पवित्र योद्धे कोणाचे युद्ध पवित्र होते याचा निवाडा इतिहास देईल; तुमचा जिहाद का माझ्या मातृभूमीसाठीची माझी लढाई?
- लेखक : सुनील कोटनाला
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : ४ फेब्रुवारी, २०२२
- अनुवादक : अमर देवगावकर
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २१६
- किंमत : ₹२८०.००
- आयएसबीएन : 9789390869688
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
भारतीय सेनेने काश्मीर व्हॅलीमध्ये पार पाडलेल्या सर्वांत धाडसी गुप्त मोहिमेची ही तिथरारक गोष्ट आहे. नव्याने उत्तेजन देऊन पाकिस्तान अत्यंत धोकादायक आणि प्रचंड कुशल अतिरेक्यांचा एक गट श्रीनगरमध्ये पाठवतो. सोव्हिएत अफगाण युद्धाचा अनुभव असलेल्या अफगाणी ओवेसीभाईच्या नेतृत्वाखाली व्हॅलीमध्ये दहशत पसरवणे आणि इतर अतिरेकी गटांवर वर्चस्व मिळवणे, हे त्यांच्या गटाचे उद्दिष्ट असते. ते सैन्याच्या छावण्यांवर आणि राज्याच्या विधानसभेवर हल्ले करतात. सार्वजनिक जागांवर बाँबस्फोट घडवून आणून अनेक लोकांना मृत्युमुखी पाडून जनतेमध्ये दहशत निर्माण करतात.
'पवित्र योद्धे' ही भारतीय सेनेच्या एका गुप्त मोहिमेची गोष्ट आहे. निवडलेले सात अधिकारी जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर अतुलनीय कामगिरी करतात. शत्रूच्या भागात घुसून ते अतिरेकी गटातील सदस्य असल्याचे सोंग करतात. टोळीयुद्ध सुरू करून अतिरेक्यांचा खात्मा करणे, हे त्यांचे ध्येय. अत्यंत धोकादायक अशा या मोहिमेत शक्यता असते, आपल्याच सेनेच्या माणसाची गोळी लागून धारातीर्थी पडण्याची.
शेवटचे पान वाचून संपले की, पवित्र योद्धे नक्की कोण, याचा निर्णय वाचकांवर सोडून देण्यात आला आहे; आपल्या मातृभूमीसाठी लढणारी माणसे, का आपल्या धर्माच्या नावाखाली कत्तल करणारी माणसे?
भारतीय सेनेने काश्मीरमध्ये पार पाडलेल्या सर्वात धाडसी गुप्त मोहिमेची गोष्ट
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-