Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

देवाच्या शोधात – पुस्तकाचे मुखपृष्ठ

देवाच्या शोधात

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : अनिल अनिल इंदुलकर
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ८ जून, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २२६
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9789393757425
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अध्यात्मासारख्या एका दैवी व रहस्यमयी विषयाशी ओळख झाल्यानंतर जिज्ञासा कशी वाढते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरी अनिल इंदुलकरांचे 'देवाच्या शोधात' हे पुस्तक! १० वर्षे मेडिटेशन केल्यानंतर त्यांची चेन्नईच्या भगवती स्वामींशी भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. २० वर्षे देवीसाधना केलेल्या लेखिकेला या काळात आलेल्या रहस्यमयी, दिव्य व मती कुंठित करणाऱ्या अनुभवांची आत्मकथा वाचताना आपण भारावून जातो. विशेष म्हणजे मुखपृष्ठावरील त्रिशूळ व कुंडलिनी शक्ती यांचे प्रत्यक्ष, जिवंत, दिव्य दर्शन लेखिकेला झाले आहे. आपल्याला आलेल्या अनुभवांची इतर साधकांना माहिती मिळून प्रोत्साहन मिळावे, हा लेखिकेचा उद्देश निश्चितच सफल झाला आहे. दैवी अनुभवांचे नाते आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, धर्माशी व राष्ट्राशी नक्कीच आहे; हे या पुस्तकात वाचायला मिळते. भलेमोठे धार्मिक ग्रंथ वाचायला आजकाल कोणालाच वेळ नाही. विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, तसेच अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या सर्वांनाच यशस्वी होण्यासाठी ही गुरुकिल्ली आहे. संदीप भानुदास तापकीर (लेखक व इतिहास अभ्यासक)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके