Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

नियतीचा खेळ  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

नियतीचा खेळ

  • लेखक : अनिल यशवंत अभ्यंकर, अनिल यशवंत अभ्यंकर
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १८ नोव्हेंबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४०
  • किंमत : ₹२८०.००
  • आयएसबीएन : 9788197958038
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘नियतीचा खेळ’ यामधील १५ कथांमध्ये विषयांची विविधता आहे. बहुतांश कथा सत्य घटनांवर आधारित व कौटुंबिक आहे. विविध नातेसंबंध, त्यामधील गुंतागुंत आणि ते गुंते सोडवण्यासाठी विविध प्रकारे केलेले प्रयत्न येथे आपल्याला पहावयास मिळतात. काही कथांमध्ये असलेला दुःखांत हा हुरहुर लावणारा व नकोसा वाटणारा असला, तरी त्या त्या ठिकाणी जीवनाचे वास्तव दर्शविले आहे हे आपण मान्य केलेच पाहिजे. शेवटी ‘नियती’ प्रत्येकाच्याच जीवनात तिचा भला-बुरा खेळ खेळत असते याचा अनुभव आपण प्रत्येक जण घेत असतोच. अर्थात, या संग्रहातील अनेक कथांमध्ये आशावाद व सकारात्मकताही आपल्याला पहावयास मिळते, जी आपल्याला सुखावते. संग्रहातील काही कथा मैत्रीचे बंध आणि त्यांचे महत्व आपल्याला जाणवून देतात. दुसऱ्याची बाजू समजून घेण्यात आलेल्या अपयशामुळे विनाकारण निर्माण होणारे समज-गैरसमज यावरही काही कथा आधारलेल्या आहेत. विषय आणि आशयात विविधता, साधे-सोपे लेखन आणि जसे अनुभवले, पाहिले, घडले, ऐकले तसे त्या त्या घटना, प्रसंग, किस्से यांचे कथारूपात ओघवते सादरीकरण हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य मला वाटते. – पराग रघुनाथ लोणकर (प्रकाशक, लेखक व प्रमुख कार्यवाह- अ. भा. मराठी प्रकाशक संघ.)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके