Logo
Logo

मधुश्री प्रकाशन, पुणे

या प्रकाशकाबद्दल

वर्ष १९७७ पासून मधुश्री प्रकाशन उत्तमोत्तम साहित्य पुस्तकरूपात रसिक वाचकांपुढे, पुस्तक प्रेमींपुढे सादर करीत आहे. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरीलही ख्यातनाम लेखक-लेखिकांबरोबरच उदयोन्मुख कवी, लेखक, नाटककारांचे दर्जेदार साहित्यास मोठ्या संख्येनं वाचक मिळवून देण्याचा वसाच मधुश्री प्रकाशनाने घेतलेला आहे. एकापेक्षा एक सरस कादंबर्‍या, कथासंग्रह, कविता, चरित्रे, प्रवासवर्णने, धार्मिक, वैचारिक, व्यक्तिमत्व विकास, मार्गदर्शनपर साहित्याचे प्रकाशन मधुश्री प्रकाशनाने इतका प्रदीर्घ काळ केले आहे आणि आजही पुस्तक निर्मितीतून साहित्यसेवेचे मधुश्रीचे हे कार्य अखंड चालू आहे. वितरणाच्या सुसज्ज यंत्रणेद्वारे मधुश्रीने प्रकाशित केलेले प्रत्येक पुस्तक महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपर्‍यातील वाचनालयांत उपलब्ध असते, घरोघरीच्या ग्रंथसंग्रहात स्थान मिळवून आहे. प्रतिथयश लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाबरोबरच नवोदित परंतु प्रतिभावान लेखक/कवींना प्रोत्साहन देण्यातही मधुश्री प्रकाशनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आजवर मधुश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या ८००हून अधिक आहे. संपर्कासाठी क्रमांक : 9850962807 website : www.madhushree.co.in email : paraglonkar@yahoo.com

या प्रकाशकाची पुस्तके

सर्व पाहा

संपर्क

paraglonkar@yahoo.com
9850962807