Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

माझी डॉक्टरकी : गंभीर आणि गमतीदार – पुस्तकाचे मुखपृष्ठ

माझी डॉक्टरकी : गंभीर आणि गमतीदार

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : अ.रा. कुलकर्णी
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ९ ऑक्टोबर, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८४
  • किंमत : ₹२६०.००
  • आयएसबीएन : 9789393757562
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

जात-पात-धर्माच्या नावाखाली आपल्या देशात प्रचंड संघर्ष, बेबनाव दिसतो आहे. अशा वेळी विनोबाजींच्या 'स्वधर्म' कल्पनेचा विचार डॉक्टरांनी करणं गरजेचं ठरतं. मी जिथे आहे, तिथल्या वंचित, गरजूंची सेवा करणे हाच माझा धर्म ! आज आपण चंद्रावर, मंगळावर जाण्याचे स्वप्न बघतो, ते वास्तवात उतरतही आहे; पण गरिबांच्या खेड्यात, आदिवासींच्या पाड्यात मोठ्यांना, लहानांना व सर्वांनाच साध्या प्राथमिक आरोग्यसेवा मिळत नाहीत. नेमेची येतो पावसाळा प्रमाणे ह्या गावांत बालमृत्यू, कुपोषण, साथरोग, मातामृत्यू घडतच आहेत. अलकाताईचं 'माझी डॉक्टरकी' हे पुस्तक तरुण डॉक्टरांना नवसंजीवनी देण्याचं काम करेल व खेड्याकडे जाण्यासाठी निश्चितच प्रोत्साहित करेल, अशी मला आशा नव्हे, खात्री आहे. अनुभव मांडताना जिवंतपणासोबतच अलकाताईचा प्रामाणिकपणा खूप भावतो. स्वतःच्या भाव-भावना, वाट्याला आलेले अपमान, उपहास, त्यांचा सात्त्विक संताप व केविलवाणी धडपड हे सर्वच अतिरेक न करता सहज मांडलेलं आहे. त्यामुळे ते कृत्रिम न वाटता जीवनानुभवांचं खरं वर्णन वाटतं. म्हणूनच ह्या पुस्तकाचा इतर भाषेत अनुवाद व्हावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वांनीच व सर्वसाधारण लोकांनीपण हे पुस्तक वाचावं. पद्मश्री डॉ. राणी बंग (संस्थापक संचालक, 'सर्च', गडचिरोली)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके