Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

राजमान्य राजश्री – पुस्तकाचे मुखपृष्ठ

राजमान्य राजश्री

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : चित्रलेखा पुरंदरे
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १९ ऑक्टोबर, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७१
  • किंमत : ₹२४५.००
  • आयएसबीएन : 9789393757975
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

"मी शिवचरित्रावर भाषण करून मिळविलेले लाखो रुपये वेगवेगळ्या संस्थांना दिले हे खरे; पण ही धन देण्याची प्रेरणा मला कशातून मिळाली आहे सांगू? शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांना भूमीमध्ये धन सापडले. ते त्यांनी लोकांसाठी विहिरी, तलाव वगैरे कामांसाठी वापरले. स्वतः महाराजांना तोरणा किल्ल्यावर धन मिळाले, ते त्यांनी स्वराज्याच्या कारणी लावले. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी स्वतःच्या साहित्य आणि कला यांवर मिळालेले लाखो रुपये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून समाजाला देऊन टाकले. अशा थोरांच्या वाटचालीने जी बाट मिळालेली आहे. तिच्यावरून चालणारा मी एक बार्टसरू आहे, ही थोर मंडळी माझी या मागची प्रेरणा आहेत. या वेळी असा आणखी एक विचार मनात येतो की, हे जग सोडून आपल्याला केव्हातरी जायचे असते आणि मग आपल्याबरोबर काय येते? हातात अंगठी असली, तर तीसुद्धा काढून घेतली जाते. इमले, बंगले, गाड्या, धन, दौलत, सोनेनाणे सारे सारे काही इथेच राहते. असे असताना मग समाजऋण फेडण्याची कसूर का करायची? आपण मिळविलेल्या मिळकतीतील काही भाग तरी मृत्युपत्रकाने रुग्णालये, वाचनालय आणि आपल्याला पसंत पडणाऱ्या मार्गाने समाजाला देण्याची इच्छा लोकांच्यात निर्माण व्हावी, असे मला वाटते."

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके