Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जीनोम ते ॐ - मानवतेचं उलगडणारं भवितव्य – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जीनोम ते ॐ - मानवतेचं उलगडणारं भवितव्य

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : डॉ. भूषण पटवर्धन
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : जुलै २०२६
  • अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
  • संपादक : सकाळ प्रकाशन
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४२९
  • किंमत : ₹५९९.००
  • आयएसबीएन : 9789347138621
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : इंग्रजी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

हे पुस्तक, जीवन, अस्तित्व आणि मानवतेच्या भविष्याबद्दल सातत्यानं उद्भवणाऱ्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळवण्याच्या उद्देशानं घेतलेला एक शोध आहे. आधुनिक विज्ञानाची प्रगती, प्राचीन विवेक आणि अध्यात्माचं विवेचन करणारा हा आंतरशाखीय आलेख आहे. हे पुस्तक एक आशा व्यक्त करतं की अनुभवजन्य मर्यादा, भौतिकवाद आणि व्यक्तिवाद यांच्या पलीकडं जाऊन प्रज्ञानाधिष्ठीत समाज अंतर्ज्ञान, नैतिकता, आध्यात्मिक मूल्यं आणि शाश्वत सुसंवादासाठी जागतिक सहकार्य आमंत्रित करेल. मानवी व्यवहारातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या, हवामानातील बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, सामाजिक अन्याय यांचं निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक प्रगती आणि नवकल्पनांबद्दल फेरविचार करणं, मानवतेच्या आणि आपल्या ग्रहाच्या उन्नतीसाठी विविध ज्ञान प्रणालींना एकत्र आणून एक नवीन प्रतिमान स्थापित करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन यात केलं गेलं आहे. प्राचीन ज्ञान समकालीन विज्ञानाशी जोडून आयुर्वेद, योग आणि सर्वांगीण कल्याणाचं महत्त्व, या विचारमंथनात आलं आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके