अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
गुलामीचं जोखड उतरलं
- लेखक : सुभा लोंढे
- प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : ८ जानेवारी, २०२६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १३२
- किंमत : ₹२७०.००
- आयएसबीएन : 9788199574656
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
“कल्पकता, प्रतिभा आणि जिज्ञासूवृत्ती ही निसर्गाची दैवी देणगी श्रीमती सुभा आत्माराम लोंढे यांना मुळातच लाभलेली आहे, हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या साहित्य कलाकृतींमधून दिसून येते. आजही त्यांचे प्रेरणादायी लेखन सुरूच आहे. त्यांच्या या साहित्य कलाकृतींमधील ‘गुलामीचं जोखड उतरलं’ (मराठवाडा मुक्तिसंग्राम) ही प्रस्तुतची कादंबरी प्रेरणादायी अशी आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याने उग्र रूप धारण केलेले होते. या मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात अनेक खेड्यांतील तरुणांनी मोठ्या धैर्याने आपले सर्वस्व पणाला लावून शौर्य गाजवले. अनेक कर्तबगार तरुण शहीद झाले. आपल्या शौर्याने, पराक्रमाने त्यांनी निजामाचे जोखड झुगारून दिले. हे निजामाचे जोखड झुगारून देण्यात गावपातळीवर पाटलापासून अगदी गावच्या शेवटच्या वस्तीपर्यंतच्या माणसाने योगदान दिले. हे योगदान देताना जी मंडळी प्रमुख होती त्यांची नावे अग्रक्रमाने मराठवाडा मुक्तिसंग्रामात नोंदवली गेली, मात्र हा मुक्तिसंग्रामाचा लढा अशा खेड्यापाड्यातील लोकांनीही लढला, ज्यांचे शौर्य इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले नाही. हे सत्य आजच्या समाजासमोर यावे, आपल्या या पूर्वजांची माहिती आणि महती पुढील पिढीला समजावी, हा या लेखनाचा प्रामाणिक असा उद्देश व हेतू आहे.
हा सारा मुक्तिसंग्राम गावपातळीवर कशा पद्धतीने लढला गेला, याची नेमकेपणाने श्रीमती लोंढे यांनी या पुस्तकात मांडणी केली आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीयतेबरोबरच आठवणींना उजाळा देणारीही आहे.”
– डॉ. जयवंत अवघडे
ज्येष्ठ साहित्यिक, सेवानिवृत्त प्रबंधक, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-