Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

पैस प्रतिभेचा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

पैस प्रतिभेचा

पेपरबॅक
आवृत्ती २
  • लेखक : दीपाली दातार, दीपाली मुकुंद दातार
  • प्रकाशन : डिंपल पब्लिकेशन, ठाणे
  • प्रकाशन वर्ष : ४ नोव्हेंबर, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४४२
  • किंमत : ₹७००.००
  • आयएसबीएन : ९७८-९३-९२४१९-९०-४
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

पैस प्रतिभेचा- मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी : - प्रतिभा रानडे या ज्येष्ठ संशोधक लेखिका असून त्यांच्या लेखनाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत पैकी सतरा पुस्तकांना राज्य शासन तसेच म.सा.प. आणि इतर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. चार वेळा विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. वाचकाला जागतिक भान देणार्‍या आणि साहित्य विश्वात वैचारिकतेची भर घालणार्‍या प्रतिभावंत लेखिका म्हणून त्यांना आपण गेली अनेक वर्षे ओळखतो. केवळ राजकीय, सामाजिक लेखनच नाही तर अनुवाद, कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र या साहित्य प्रकारातून त्यांनी हाताळलेले विविध विषय थक्क करणारे आहेत. धर्म, संस्कृती, राष्ट्र, इतिहास, दहशतवाद, जागतिकीकरण, हिंदू मुस्लिम स्त्रिया, त्यांच्या समस्या, स्त्री जाणीवा, माणसाच्या मनोवृत्ती, त्यातले संगत, विसंगत, देव-धर्म या संकल्पना, विश्व निर्मिती, मृत्युचे गूढ अशा अनेक विषयांकडे समग्र दृष्टीने, तर कधी वेगळेपणाने पहात त्यावर सविस्तर लेखन आपल्या पुस्तकातून त्यांनी केले आहे. भारतात माणिपूर, शिलोंग, दिल्ली, मुंबई, पुणे भारताबाहेर अफगाणिस्तान, पाकिस्तान, जेरूसलेम, लंडन अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य झालेले आहे. अमृता प्रीतम, गफार खान, पंतप्रधान इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, विदुषी दुर्गाबाई भागवत, गोपाळ गणेश आगरकरांचे नातू श्रीराम आगरकर, शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर अशा अनेक दिग्गज लोकांना त्या भेटल्या. संशोधकीय कामाच्या निमित्ताने, अभ्यासाच्या निमित्ताने तर कधी कुतुहलापोटी सामान्य लोकांपासून, प्रतिष्ठीत मान्यवरांपर्यंत चारशे पाचशे मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. त्यांच्या पुस्तकातून आलेले हे विषय तसेच त्यांचे निसर्गप्रेम, त्यांना असलेली भाषा सौंदर्याची, चित्रकलेची जाण, रामायण, महाभारत याकडे त्यांचे पाहणे, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, सुधारक आगरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक, बॅरिस्टर जिना, या इतिहासातल्या महत्वाच्या व्यक्तीमत्वांवर, फैज अहमद फैज, अमीर खुसरो, काझी नझरूल इस्लाम यासारख्या कवींवर त्यांनी टाकलेला प्रकाश, ‘नलपाक दर्पण’ या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने अन्न संस्कृतीवर त्यांनी केलेले संशोधन अशा अनेकविध विषयांवर आणि त्यांच्या समृद्ध आयुष्यावर मोकळेपणाने केलेल्या आस्वादक गप्पा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रतिभाताईंची वैचारिक भूमिका, त्यांचे साहित्यिक योगदान आणि व्यक्तीगत आयुष्य या तीन मुख्य भागांचे अधिक बारकाव्याने वर्गीकरण करताना ताईंची वैचारिक भूमिका तीन भागात विभागली. त्यांचे साहित्यिक योगदान, कला-साहित्यविषयक चिंतन दोन भागात आणि त्यांची वैय्यक्तिक आयुष्य आणि अनुभव दोन भागात विभागले. तर अशी ही सात प्रकरणे खालील प्रमाणे १. धर्म संस्कृती आणि मानवी जीवन २. धर्म, देश, राष्ट्र आणि जागतिकीकरण ३. धर्म, स्त्रिया आणि आधुनिकता ४. प्रतिभाताईंचा लेखनप्रवास ५. साहित्यचिंतन आणि कलादृष्टी ६. व्यक्तिविशेष आणि भावजीवन ७. प्रतिभाताईंचे कल्पना आणि विचारविश्व

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके