Logo
Logo
दीपाली मुकुंद दातार यांचे छायाचित्र

दीपाली मुकुंद दातार

अल्प परिचय

शिक्षण - • M. Sc. गणित (B.Sc ला विद्यापीठात प्रथम), प्रोफेशनल डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल (PMP Certified), • शास्त्रीय संगीत – उपान्त्य विशारद (गांधर्व महाविद्यालय), • भारतीय संस्कृती दर्शन उपासक पदवी प्राप्त (समर्थ विद्यापीठ, शिवथरघळ) नोकरी – २० वर्षे माहिती तंत्रज्ञान(आयटी) क्षेत्रात डेव्हलपर, टेस्टर, टीम लीडर, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे. सहा महिने भारताबाहेर, ‘यूनायटेड किंगडम-शेफील्ड’ मध्ये नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. साहित्यिक वाटचाल- • वीसहून अधिक वर्षे कविता व ललित लेखन, तीन प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून तसेच हंस, मौज, साहित्यसूची, शब्ददर्वळ, साहित्य संवेदन, संचार, साहित्य चपराक, एकता, रानवारा, सुश्रेय, अक्षरवैदर्भी, समतोल, प्रजावाणी, मिळून सार्‍याजणी, अंतरीचे प्रतिबिंब अशा अंकातून कविता व ललित लेख प्रकाशित, अनेक कविसंमेलनातून निमंत्रित कवी म्हणून सहभाग. • महाराष्ट्र टाइम्स, सकाळ इत्यादी वर्तमान पत्रातून पुस्तक परिचय (परीक्षणे) प्रसिद्ध. • ‘आल्हादिनी’ या संस्थेची स्थापना आणि त्यायोगे गेली दहा वर्षे साहित्यिक, सांगीतिक आणि आध्यात्मिक अशा २८ कार्यक्रमांचे आयोजन. • ‘सेतू अभिवाचन मंचा’ची गीतांजलि जोशी यांच्यासह स्थापना व त्याद्वारे अनेक संहितांचे लेखन आणि अभिवाचन. • ‘कवितेची जन्मकथा’ हे सदर ‘दैनिक संचार’, सोलापूरमधून प्रसिद्ध. त्या लेखांचे ‘शारदीय मोरपिसे’ललित लेखसंग्रह ऑगस्ट २०१९मध्ये प्रसिद्ध (गीतांजलि जोशी यांच्याबरोबरचे सहलेखन). • जुलै २०२२मध्ये मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकरता ‘अक्षरांच्या वाटेवर’ या कार्यक्रमात प्रतिभा रानडे यांची मुलाखत घेतली. • जानेवारी २०२३मध्ये झालेल्या ‘नुक्कड साहित्य संमेलनात’ आमंत्रित वक्त्या म्हणून सहभाग. शांताबाई कांबळे यांच्या ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ या पुस्तकावर मुक्तचिंतन. • ४ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘पैस प्रतिभेचा – मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी’ हे पुस्तक प्रकाशित. • १ जानेवारी २०२५ रोजी ‘तळ्यातले आकाश’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध. • ४ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणार्‍या ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनात कविता सादर करण्यासाठी आमंत्रण. पुरस्कार – • ‘पैस प्रतिभेचा’ या पुस्तकाला १) महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ‘उत्कृष्ट लक्षवेधी’ साहित्यासाठी २०२३चे शरच्चंद्र भालेराव परितोषिक, २) ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव’ पारितोषिक, ३) ‘छ. चौथे शिवाजी महाराज’ अहल्या नगरचा राज्यस्तरीय वैचारिक साहित्य पुरस्कार. • अक्षरधारा, पुस्तकपेठ, रसिक साहित्य आणि राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या स्वरचित कविता लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक • ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकसत्ता वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या ‘कविता पानोपानी’ या काव्योत्सवात कवितेची निवड • पुण्यातील काव्यसप्ताहात ‘शांता गोविंद पुरस्कार’ • ‘रंगगंध कलासक्त न्यास’ चाळीसगाव, ‘आयपार’ अशा मान्यवर संस्थांच्या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत सांघिक पुरस्कार