Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

न मारलेल्या गप्पा - दुनियादारी या गाजलेल्या वाचकप्रिय सदरातील गोष्टी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

न मारलेल्या गप्पा - दुनियादारी या गाजलेल्या वाचकप्रिय सदरातील गोष्टी

  • लेखक : आदित्य शिरीष महाजन
  • प्रकाशन : उन्मेष प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : ४ ऑक्टोबर, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६४
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

एखाद्या छान गाण्याच्या हलक्या-फुलक्या शब्दांप्रमाणंच काही तरल आणि सोप्या शब्दांत, अनेक अर्थ दडलेल्या कथा आदित्य महाजन लिखित ‘दुनियादारी’ या ‘सकाळ’ मधील सदरात मागच्या वर्षी वाचायला मिळाल्या, आणि नुकतंच याच कथांचं ‘न मारलेल्या गप्पा’ हे पुस्तक प्रकाशित झालं. साधं, सोपं, सरळ आणि मनाला आनंद देणाऱ्या लेखनांमध्येही आयुष्याचं तत्त्वज्ञान लपून बसलंय. त्यामुळे ‘न मारलेल्या गप्पा’ हे पुस्तक कोणीही स्वतःशी अगदी सहजपणे रिलेट करू शकतं. यातील काही गोष्टी वाचताना तर आपण स्वतःलाच त्या गोष्टीच्या भूमिकेत बघायला लागतो, यातच लेखकाचं यश आहे. पुस्तक वाचताना हेही जाणवतं, की प्रत्येक गोष्टीत लेखकानं ‘त्या दोघांमधलं’ एक खास नातं खूप हळवेपणानं खुलवलं आहे. कथा वाचताना छान हसू ओठांवर येईल असा आशय प्रत्येक कथेत आहे. प्रत्येक वेळी प्रियकर-प्रेयसीच नाही तर, नात्यांमधले अनेक पैलू या गोष्टींमध्ये दिसून येतात. वाचताना असं वाटत राहतं, की हे आपल्यासोबत घडून गेलंय, किंवा असं काहीतरी आपल्यासोबतही घडलं पाहिजे... अनेक जण हे पुस्तक वाचताना मनातल्या मनात शाळा-कॉलेजची चक्कर मारून येतील, कॉलेजमधल्या ‘ती’च्या आठवणीत रमतील! हे पुस्तक फक्त तरुणांचं नाही, तर तरुण राहण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. या पुस्तकात ४९ कथा आहेत. प्रत्येक कथांमधील नायक, नायिका त्यांच्याच गोड क्षणांमधून आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. कधी तो खट्याळ, खोडकर, मस्तीखोर आहे, तर कधी तो समजूतदार, आश्वासक, प्रेमळ आहे... तर कधी ती थोडी निरागस, लाडिक पण तितकीच समजूतदारही आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके