Logo
Logo
आदित्य शिरीष महाजन यांचे छायाचित्र

आदित्य शिरीष महाजन

अल्प परिचय

गोष्टी वाढवून चढवून सांगणारा माणूस म्हणून ओळखला जाणारा मिश्किल आदित्य हा व्यवसायाने जाहिरात लेखक आहे. इंडियन एक्सप्रेस, रेडिओ मिरची, ट्रिफोबो, आणि टेम्पेस्ट आणि थिंकिंग पार्टनर्स सारख्या पुण्यातील जाहिरात कंपन्यांमध्ये काम करून त्याने त्याच्या चातुर्याचा परिचय अनेकदा दिला आहे. विविध कला जोपासणारा आणि हसत खेळत राहणाऱ्या आदित्यला कविता, शेरो-शायरी आणि संगीत, गाणी, मैफिलींची भरपूर आवड आहे. त्याचा 'यमक वगैरे' हा काव्य-संगीताचा अनोखा कार्यक्रम प्रचलित आहे. त्याचे सकाळ वृत्तपत्रातील 'दुनियादारी' हे २०२२ मधले सदर प्रचंड गाजले होते. त्याचेच पुढे 'न मारलेल्या गप्पा' हे पुस्तक सुद्धा सर्वांच्या पसंतीस पडले. २०१८ मध्ये देखील 'नवी खिडकी' ह्या सदरात पहिल्यांदाच वेगवेगळ्या वेब सिरीजचा आढावा घेणारे लेख आदित्यने सकाळ वृत्तपत्रात लिहिले होते. त्याने 'दीदार' नावाचे हिंदी चारोळ्यांचे पुस्तक आणि 'भेटीस्तान' हे स्टोरीटेलवर ऑडिओबुक सुद्धा लिहिले आहे. सकाळ वृत्तपत्रासोबतच त्याने प्रभात वृत्तपत्र आणि इतर अनेक मासिकांसाठी लिखाण केले आहे. सोशल मीडियावरील त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चारोळ्या बऱ्याचदा गाजल्या आहेत.