Logo
Logo
वंदना अतिश बोकील यांचे छायाचित्र

वंदना अतिश बोकील

अल्प परिचय

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी * एस.एन.डी.टी. व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे एम.ए.ला अनेक वर्षे मराठी साहित्याचे अध्यापन केले असून सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पीएच.डी.साठी मार्गदर्शन करतात. * `संपादित सानिया', `निवडक मंगला गोडबोले', `कथायात्रा', कथादीपावली' व `पांथस्थ' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. * कथा आणि नाटक हे आस्थेचे आणि विशेष अभ्यासाचे विषय असून त्यावर अनेक संशोधन व समीक्षापर लेख लिहिले आहेत. ते विविध ग्रंथांमधून प्रकाशित झाले आहेत. * केल्याने भाषांतर' या परकीयभाषेतून थेट मराठीत भाषांतरित होणार्‍या साहित्याला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या गेली १० वर्षे शैलीसंपादक आहेत. तसेच `संवादसेतू' या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत. * साहित्य अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सातत्याने करत असतात. * कथालेखन, ललित लेखन यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतात. * विविध श्राव्य माध्यमे आणि माहितीपट-लघुपट यांसाठी संहितालेखन आणि सादरीकरण करतात.