Logo
Logo
वामन लेले यांचे छायाचित्र

वामन लेले

अल्प परिचय

जन्म : मुंबई, २९ मे १९३३ मृत्यू : १३ फेब्रुवारी २००७ *** शिक्षण * एम.ए. प्रथम वर्ग (मुंबई विद्यापीठ, १९५६ * मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल न.चिं. केळकर सुवर्णपदक प्राप्त * पीएचडी (पुणे विद्यापीठ, १९७०) *** व्यवसाय व अनुभव * ३६ वर्षे मराठी ह्या विषयाचे विद्यापीठ स्तरावर अध्यापन केल्यावर जून १९९३ मध्ये मराठीचा प्राध्यापक ह्या पदावरून काशी हिंदू विश्व विद्यालयामधून सेवानिवृत्त. *** लेखन-संशोधनाचे विशेष विषय : * प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा, पाश्चात्य शैलीशास्त्र , प्राचीन शास्त्रीय ग्रंथांची रचनापद्धती, परिवर्तित वाक्यसर्जक व्याकरण, मराठी साहित्य . *** प्रकाशित साहित्य * भाषांतरित व स्वतंत्र मिळून एकूण २८ पुस्तके. *** प्रमुख स्वतंत्र पुस्तके अशी : * औचित्यसिद्धांत आणि औचित्यविचार चर्चा l * भारतीय काव्य शास्त्रीची उत्क्रान्ती: प्रथम युग l * काव्य, शास्त्र व संस्कृति l * विचार और विवेचन l * गजेन्द्रमोक्ष l * The Doctrine of the Tantrayuktis l * काव्य्सूत्रसंहिता l * ललितलेखन व शैली l * ज्ञानेश्वरीचा शास्त्रीय अभ्यास l * वाग्विलास l * भाषा, साहित्य व शास्त्र : काही विचार l * शैलीशास्त्र भामह l शांकुतल शैलीशास्त्रीय अभ्यास l * वाक्य्कोश भाग 1 / २ / ३ * भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौन्दर्य * A Critical study of Vamans's Kavyakabjarasutrani * Methodogy of Acient Indian Sciences *** पारितोषिके व पुरस्कार * महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार (१९६८, १९७१, १९८७) * महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेची वार्षिक पारितोषिके (१९६९ व १९७६) * त्याच संस्थेचे 'अमृत महोत्सव विशेष पारितोषिक' (१९७१) * मुंबई विद्यापीठाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर पारितोषिक (१९७० व १९७६) * पुणे विद्यापीठाचे डॉ. य.वि.परांजपे पारितोषिक व न.चिं. केळकर पारितोषिक (१९६९-७०) * पुणे विद्यापीठाचा संत ज्ञानदेव पुरस्कार (१९८८) * भारत सरकारचा विश्व विद्यालयस्तरीय मौलिक ग्रंथासाठी राष्ट्रीय पुरस्कार. (१९८१) * उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान (लखनौ) चा सौहार्द सम्मान पुरस्कार (१९९१-९२) * महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) चे प्रा. रा.श्री. जोग समीक्षा पारितोषिक (१९९५-९६) * ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था (पुणे)चा पं. राजाराम शास्त्री नाटेकर गौरव पुरस्कार (१९९७) * महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाड्मय दादोबा पांडुरंग पुरस्कार (२००४-०५)