प्रोफाइल लोड करत आहे...
सुश्रुत कुलकर्णी
अल्प परिचय
सुश्रुत कुलकर्णी अनुभवी संपादक व अनुवादक आहेत. मुळात आयटी उद्योगाची पार्श्वभूभूमी असणाऱ्या सुश्रुत कुलकर्णी यांनी अनेक पुस्तकांचे लेखन व अनुवाद केलेले आहेत. अष्टपैलू स्मार्टफोन या त्यांच्या पुस्तकाच्या एका वर्षात आठ आवृत्त्या आल्या होत्या. अनुवाद क्षेत्रात त्यांनी ॲनिमल फार्म, नोबेल पारितोषिक विजेते काझुओ इशिगुरो यांचे ’व्हेन वुई वेअर ऑर्फन्स’ तसेच ‘आरुषी’ या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद केलेला आहे. याखेरी युवाल नोआ हरारी यांचे गाजलेले ’होमो डेअस’ हे पुस्तक, तसेच इलॉन मस्क यांच्या अधिकृत चरित्राचाही त्यांनी अनुवाद केलेला आहे. वास्त्ववदर्शी म्हणजे ‘नॉन फिक्शन’ या प्रकारच्या साहित्याचे अनुवाद करायला त्यांना आवडतं.
सध्या ते आर्टिफिशल इंटेलिजन्स या विषयाचा अभ्यास करत आहेत. ते गेल्या दोन दशकांपासून लेखन - संपादन क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते बंगलोरस्थित प्रथम बुक्स या मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थेचे सल्लागार संपादक म्हणून कार्यरत होते. सध्या ते एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन येथे प्रमुख संपादक म्हणून कार्यरत आहेत.