Logo
Logo

श्रीकृष्ण जनार्दन जोशी

अल्प परिचय

श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. ‘१९३८ साली मराठी विषय घेऊन तिसऱ्या वर्गात बी.ए. झालो' असा उल्लेख आपल्या 'पुणेरी' या पुस्तकात करून ते म्हणतात की, घराण्यातील पहिला पदवीधर मीच! नोकऱ्यांचा दुष्काळच होता. त्यांनी फुटकळ नोकऱ्या केल्या. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे पुण्याच्या आसपास निघालेल्या लष्करी डेपोकडे बेकारांची रीघ लागली. वानवडीच्या मिलिटरी अकाउन्ट्स ऑफिसमध्ये कारकून हुद्द्यावर जोशींना नोकरी लागली व ३२ वर्षांनी ते तिथूनच निवृत्त झाले. नोकरी लागण्यापूर्वी त्यांच्या अनेक कथा किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. श्री. म. वि. गोखले यांच्या सहकार्याने तीन भागांत प्रकाशित केलेल्या 'ऐलमा पैलमा'च्या भूमिकेत जोशी लिहितात की, 'आंतरराष्ट्रीय महिलावर्षाच्या निमित्तानं मराठी स्त्रीच्या जीवनावर प्रकाश पाडणारं पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. १८६० ते १९६० या शंभर वर्षांच्या काळात सहा पिढ्या होऊन गेल्या असे गृहीत धरून मराठी स्त्रीच्या जीवनात कसे-कसे बदल होत गेले, याचा त्यांनी धांडोळा घेतला आहे. एकाच मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती हा शंभर वर्षांचा इतिहास लेखक द्वयाने गुंफला आहे. जोशींच्या 'पुणेरी' या पुस्तकातील लेख नुसतेच ललित नसून त्यांमध्ये काही सामाजिक आणि ऐतिहासिक आशय आहे, असा उत्कट प्रत्यय वाचकाला येतो. 'काळ' या दैनिकात जोशी यांनी 'किसन' या टोपणनावाने ब्रिटिश सरकार, स्वातंत्र्योत्तर काँग्रेस सरकार, गांधीजी, जीना, चर्चिल वगैरेंवर टीकास्त्र चालवले होते. 'चर्चिल मेडिकल कॉलेज' हा लेख खूपच गाजला. त्या लेखाबद्दल सरकारने 'काळ'कडून दोन हजार रुपयांचा जमीनही घेतला होता. लेखप्रकाशनाच्या बाबतीत 'काळ'कर्ते मामा दाते यांनी टिळकांचा बाणा दाखवला. 'किसन' म्हणजे कोण, याचा पत्ता लागू दिला नाही. दाते तुरुंगात गेले. जोशींचा कारावास वाचला व नोकरीही शाबूत राहिली. श्री. पु. भागवत त्यांना म्हणाले, “तुमचे लेख फार चांगले असतात.” मोरारजी देसाईंनी दाते यांना सांगितले, “युवर किसन हॅज अ पॉयझनस पेन !” * मी पुण्याहून लिहितो की....' ही जोशी यांची लेखमाला, महाराष्ट्र टाइम्समध्ये वर्षभर येत होती. जोशींच्या 'आनंदीगोपाळ' कादंबरीने चरित्रात्मक कादंबरीचा प्रवाह मराठीत आणला. गोपाळरावांच्या हटवादी स्वभावामुळे डॉक्टर होण्यासाठी परदेशी गेलेल्या कोवळ्या वयाच्या आनंदीबाईंची झालेली फरफट जोशींनी प्रवाही भाषेत चित्रित केली आहे. ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्या कादंबरीवर जोशींनी पुढे नाटकही लिहिले. काशीनाथ घाणेकरांच्या भूमिकेमुळे ते रंगभूमीवर चांगलेच गाजले. जोशींनी लिहिलेली 'रघुनाथाची बखर' (श्री. र. धों. कर्वे यांच्यावर लिहिलेली) ही कादंबरी चर्चेचा व टीकेचा विषय झाली. श्री. ज. जोशींचे एकूण ३५ कथासंग्रह प्रकाशित झाले. ‘पांढरपेशांचे जग' (१९४४), 'सुलभा' (१९५६), 'मामाचा वाडा' (१९६२), 'ओलेता दिवस' (१९६५), 'अनुभव' (१९७५) हे त्यांतील काही, वर उल्लेख केलेल्या दोन कादंबऱ्यांव्यतिरिक्त 'धूमकेतू' (१९७६), 'काचपात्र' (१९८५) अशा इतरही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. मनोहर माळगावकर व आर. के. नारायण यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद श्री. जं.नी केले. ललित लेखनात ‘पुणेरी' (१९७८), 'सूर्यापोटी' (१९७१), 'सुचलं तसं लिहिलं', 'जोशी पुराण' इत्यादींचा समावेश होतो. बाहुल्या' मध्येही (१९३१) तिला बाहुल्यांशी खेळायचे असताना; तिने काळानुसार शिक्षणाला महत्त्व द्यावे म्हणून भोवतालची माणसे तिच्यावर दबाव आणतात. 'प्रेमाचा वाटा' मधील (१९३०) नायिका निर्मला हिला आपल्या आयुष्यात आलेले दोघेही आवडतात आणि तिला निवड करणे अशक्य झाले आहे आणि त्यामुळे तिची झालेली उलघाल असा वेगळाच धक्कादायक विचार आहे. तर 'शांती'मध्ये (१९३४) ज्या मुलावर सगळ्या आशा केंद्रित केल्या, तो आपल्या नवऱ्याकडे अधिक ओढ घेतो म्हणून मुलाबद्दल तिटकारा वाटणारी आई आहे. 'वरयोजना'मध्ये (१९३१) मध्यमवर्गीय मुलींच्या विवाहाची समस्या हलक्या फुलक्या पद्धतीने मांडली असली, तरी तिची तीक्ष्णता जाणवते. जसा विषय, जशी समस्या; तशी त्यांची भाषाशैली वळण घेते. 'पतिव्रता' (१९३२) या कथेत व्यसनी, गुन्हेगार पतीला, कुटुंबाच्या भल्याचा विचार करून, लक्ष्मी घराबाहेर काढते. काही कथांची बीजे उदाहरणार्थ 'कोकणी वहाणा' (१९३१), 'माझी बाग' (१९३१), त्यांच्या स्वानुभवात आहेत; तर काहींची बीजे भोवतालचे निरीक्षण, मैत्रिणींच्या, कुटुंबांतील स्त्रियांच्या मानसिकतेत आहेत. अनुभवांची श्रीमंती त्या काळच्या स्त्रियांच्या मानाने त्यांच्या द्विपदवीचे शिक्षण, बनारस, बडोदा, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणचे वास्तव्य, बालपणीच आई-वडिलांचे निधन आणि आजीने संभाळणे, भल्या थोरल्या वाड्यातून लहानशा जागेत राहणे; असे त्यांचे अनुभवविश्व वेगळे आणि समृद्ध होते. शिक्षणाने तोलामोलाच्या पतीची तितकीच समजूतदार साथ, प्राध्यापिका - प्राचार्या अशा पदांवर काम करण्यातून त्यांचे आयुष्य समृद्ध होत गेले आणि त्या अनुभवांची श्रीमंती त्यांच्या कथा - लेखनातून दिसते. समाजाकडे पाहण्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, स्वतःची वैचारिक भूमिका यांतून 'स्त्री - जीवनविषयक प्रश्न' आणि 'स्त्री - जीवनाची नवी क्षितिजे' या पुस्तकांची निर्मिती झाली. शतकानुशतके स्थितिमान असलेली भारतीय स्त्रीशिक्षणामुळे कसकशी बदलली आणि आता तिच्यापुढे कसे प्रश्न उभे राहिले आहेत? कोणते ? का? त्यांवर काय उपाय करता येतील ? वैयक्तिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या या प्रश्नांचा त्या समग्र आणि सखोल विचार करतात. विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी अशीच ही पुस्तके आहेत. तरीही शैली भारदस्त असून सुगम आहे. 'युधिष्ठिर'मधील (१९७०) सर्वच व्यक्तिरेखा लक्षवेधी आहेत. त्यांची विनोदबुद्धी लखलखीत होती. आपल्याला फारसे रूप नाही, याची त्यांना जाणीव होती. त्यांची आणि बालगंधर्वांची जन्मतारीख एकच म्हणजे '२६ जून' तेव्हा त्या थट्टेने म्हणत, “त्या तारखेचे रूपसौंदर्य बालगंधर्वांनी घेतले. माझ्या वाटणीला काही उरलेच नाही.” त्यांची ही वृत्ती, कडू-गोड आठवणी, शिक्षणाने मिळालेली समृद्धी, वैचारिकता, सहृदयतेने स्त्रियांच्या मानसिकतेकडे पाहणे, प्रश्नांच्या सर्व पैलूंना स्पर्श करण्याची परिपक्कता, अंतर्मनाच्या गाभ्याला भिडण्याची क्षमता हे सारे त्यांच्या सर्व तन्हांच्या लेखनातून जाणवते.