Logo
Logo
संजय उद्धव आर्वीकर यांचे छायाचित्र

संजय उद्धव आर्वीकर

अल्प परिचय

जन्म - नागपूर शिक्षण : बी.ए. एल.एल.बी., एम. एम.सी. जे. लेखनः कथा-कविता तसेच साहित्य-नाटक-चित्रपट याविषयी समीक्षापर लेखन. लेखक-कलावंतांशी प्रदीर्घ संवादांची पुस्तके प्रकाशित. १)‘शोध एलकुंचवारांच्या नाट्य़कृतींचा’ २)’त्रिवेणी’ ३)प्रारंभ’ ४)‘नव्या अवकाशातील आनंदयात्रा’ ५) ‘काळ्या सूर्याखालच्या गोष्टी, (संपादित) ६)‘विश्वांगण’ ७)‘प्रतिसृष्टी’, ८)‘सोलेदाद'शी प्रदीर्घ संवाद, ९) 'आत्म-प्रकाश' १०) संवाद सदेह 'फॅन्टसी'शी ही पुस्तके प्रसिद्ध. पुस्तकांना साहित्यसंस्था आणि राज्यशासनाचे पुरस्कार, स्त्री-लिखित मराठी कथा,(१९५०-१०) प्रतिभा,कलानिर्मिती, कलाभ्यास या सारख्या ग्रंथांना प्रदीर्घ प्रस्तावना. भारतीय माहिती सेवा या संवर्गातील स्वेच्छानिवृत्त अधिकारी,तीन दशकांपेक्षा अधिक काळ मुद्रित आणि इलेक्ट्रानिक प्रसार-माध्यमातील कामाचा अनुभव. साहित्य,वृत्तपत्रविद्या, संप्रेषणशास्त्र आणि नाट्यशास्त्र,चित्रपट- रसग्रहण यासाठी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांसाठीच्या बहुविद्याशाखीय अभ्यासवर्गांसाठी निमंत्रित व्याख्याते म्हणून योगदान.