Logo
Logo
सदानंद श्रीधर मोरे यांचे छायाचित्र

सदानंद श्रीधर मोरे

अल्प परिचय

डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत. ] *** शिक्षण : सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे. * ‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी.चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला. * डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘कारकीर्द ॲवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन ॲन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे. *** व्यवसाय : डॉ. सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत. * तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.] मोरे यांनी अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत. * डॉ. सदानंद मोरे हे इ.स. २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते. जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. *** डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेले/संपादित केलेले ग्रंथ * अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन) * अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८) * उजळल्या दिशा – बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाटक (अक्षर प्रकाशन, मुंबई २००१). सदानंद मोरे यांचे हे पहिलेच * नाटक अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केले होते. * उंबरठ्यावर * कर्मयोगी लोकमान्य * कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे) Kŗsna -The man and his mission (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९५) * गर्जा महाराष्ट्र * द गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली) * गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२) * जागृतीकार पाळेकर (चरित्र -जे पी एस पी, पुणे १९९६) * ताटीचे अभंग – एक विवेचन (भागवत प्रबोधन, देहू १९९५) * तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१) * तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन) * तुकाराम दर्शन (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९६) * त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५) * निवडक सकल संत गाथा * पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५) * प्रसादाची वाणी (सकाळ प्रकाशन) * मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर) * महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५) * या सम हा * वि.का. राजवाडे समग्र साहित्य, प्रस्तावना खंड – संपादन (राजवाडे संशोधन मंडळ, धुळे) * लोकमान्य टिळक यांचे चरित्र (गंधर्व वेद प्रकाशन) * लोकमान्य ते महात्मा (२ खंड, राजहंस प्रकाशन, पुणे) * लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (मनोविकास प्रकाशन) * वारकरी साहित्य भूमिका आणि स्वरूप (नाना पाटील ॲकॅडमी पुणे १९९५) * वाळूचे किल्ले * विद्रोहाचे व्याकरण * शिवचरित्र (नाटक) * क्षितिज * ज्ञानदेव तुकाराम (देहू देवस्थान प्रकाशन २०००) * ॲग्रोवन दैनिकात संत तुकारामांच्या साहित्यावर ‘अध्यात्म’ नावाचे सदरलेखन * महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता आदी दैनिकांतून आणि साप्‍ताहिक साधना, साप्‍ताहिक लोकप्रभा, साप्‍ताहिक * * विवेक आदींमधून लेखप्रकाशन * "मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा" या पुस्तकाची प्रस्तावना * साप्‍ताहिक सकाळमध्ये स्तंभलेखन (विषय : टिळकांकडून गांधींकडे नेतृत्वाचे हस्तांतरण) * साप्‍ताहिक सकाळमधून “गर्जा महाराष्ट्र’, “तुकाराम दर्शन’, "महाराष्ट्राची लोकयात्रा" आणि “लोकमान्य ते महात्मा", "विचारांच्या सावल्या" या लेखमाला. *** पुरस्कार * उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार. * अनंत काणेकर पुरस्कार, मुंबई * मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार * पुण्याच्या कला गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार * नाट्य गौरव पुरस्कार * नाट्यदर्पण पुरस्कार, मुंबई * मुंबईच्या नाट्य परिषदेचा पुरस्कार * मामा वरेरकर पुरस्कार, मुंबई * रंगदर्पण पुरस्कार, मुंबई * शिव मंत्री स्मृती पुरस्कार * तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी १९९८ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अन्य १५ संस्थांचे पुरस्कार * अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यांचा पुरस्कार * इचलकरंजीचा ग्रंथोत्तेजक पुरस्कार * पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या ग्राम जागर साहित्य संमेलनाचा पुरस्कार * ना.गो. चाफेकर पुरस्कार * प्रो.पी.आर. जिनसीवाले पुरस्कार * तनपुरे महाराज पुरस्कार (पंढरपूर) * संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार * अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार * पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार * सत्यशोधक मुकुंदराव पुरस्कार, तारावाडी * समर्थ रामदास पुरस्कार, माळेगाव * लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:- * कळवा येथील जवाहर वाचनालयाचा गोपीनाथ शिवराम पाटील पुरस्कार * महाराष्ट्र सरकारचा महात्मा जोतिबा फुले राज्य पुरस्कार * पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं.ना. जोशी पुरस्कार * नाशिकचाच प्रसाद बन वाङमय पुरस्कार * ना. के. बेहरे पुरस्कार, पुणे * मराठी ग्रंथालय पुरस्कार, पुणे * नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा मु.बा. यंदे साहित्य पुरस्कार * कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार * सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर * ’द गीता : अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन’ या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी असलेला गुरुदेव दामले पुरस्कार * अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेत २०१७ चा इतिहासभूषण वा .सी. बेंद्रे पुरस्कार . * न.चिं. केळकर पुरस्कार - ’कर्मयोगी लोकमान्य’साठी * सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावचा अखिल भारतीय श्री दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार