Logo
Logo

रमेश कोटस्थाने

अल्प परिचय

प्रा. रमेश कोटस्थाने हे नाव नाट्यक्षेत्रातील जाणत्या प्रेक्षक-समीक्षक रसिकांना चांगले परिचित आहे. अर्ध्या शतकाहूनही अधिक काळ त्यांनी नाटक, एकांकिका, नभोनाट्य, एकपात्री प्रयोग, बालनाटिका, नाट्यछटा आदी विविध प्रकार सातत्याने लिहून हे नाव केलेले आहे. अनेकविध स्थानिक ते राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांच्या कलाकृती कितीतरी संघांनी सादर केल्या आहेत, अजूनही करीत आहेत. पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक, कुमार कला केंद्राचे ‘सवाई लेखक’ हे गौरवचिन्ह, साहित्य संघाचा ‘डॉ. भालेराव’ पुरस्कार व लेखनाची अनेक प्रथम पारितोषिके या नावाला सार्थ करीत आहेत. ~