Logo
Logo
राजीव जोशी यांचे छायाचित्र

राजीव जोशी

अल्प परिचय

डॉ. राजीव जोशी, एम. बी. बी. एस., एम. डी. बालरोगतज्ज्ञ, एल. एल. बी. • पत्नी डॉ. मानसी जोशी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ) यांच्याबरोबर ‘श्री जे हॉस्पिटल'मध्ये कार्यरत. • माहितीतंत्रज्ञानाचा अभ्यास करुन रुग्णालयांसाठी संगणकप्रणाली. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या आय. सी. एम. आर. संस्थेसाठी संगणकप्रणालीची निर्मिती. • अमेरिकेच्या आरोग्यखात्याने २००८ साली प्रायोजित केलेल्या ‘फेलोशिप इन बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्स’ या कार्यशाळेत सहभाग. २०१५मध्ये या विषयाच्या इंडियन असोसिएशनचे अध्यक्षपद. • २०२१मध्ये एल. एल. बी. पदवी प्राप्त. • डॉक्टरांविरुध्द होणारे हल्ले थांबवण्याच्या दृष्टीने जनहितयाचिका दाखल केली. सध्या रुग्ण आणि डॉक्टर यांना न्यायवैद्यकीय सल्ला देऊन कोर्टात न जाता समेट कसा घडवून आणता येईल, यासाठी प्रयत्नरत. • ‘मेडिकोलीगल सोसायटी ऑफ इंडिया’चे संस्थापक.