प्रोफाइल लोड करत आहे...
रामदास खरे
अल्प परिचय
जन्म - ठाणे, लेखनाबरोबरच फोटोग्राफी, दुर्ग भ्रमंती, चित्रकला हे छंद जोपासत आहे. २०१८मध्ये पहिले पेंटिंग प्रदर्शन ठाण्यात झाले. आजवर ५० हून अधिक पुस्तकांची, मासिकांची मुखपृष्ठे साकारली आहेत. संग्रही जवळपास ३५० साहित्यिकांची दुर्मिळ हस्ताक्षर पत्रे आहेत. आजवर कविता, कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, चरित्र या साहित्यप्रकारात लेखन केले आहे. एकूण १८ पुस्तके प्रकाशित.
प्रकाशित साहित्य :
कवितासंग्रह: स्पंदन (१९९४), जीर्ण देव्हारा (२००४), सी.टी.स्कॅन ( २०१५), आता अटळ आहे (२०२१).
संकीर्ण : कॅलिडोस्कोप -(लेखसंग्रह) (२०१७), पत्रसंवादु (लेखसंग्रह )- (२०१८), ओळख वाद्यांची मैत्री
स्वरांशी (२०२१), पत्रास कारण की (लेखसंग्रह )(२०२३), आणि ग्रंथोपजीविये-ईबुक-भाग ५. ( पुस्तक
परीक्षणे ) (२०२१ ते २०२४)
चरित्र लेखन: प्रभो शिवाजीराजा - (२०१८), शूर आम्ही सरदार- (२०१९), गोष्टीरूप गांधीजी (२०२१),
मनकर्णिका-राणी लक्ष्मीबाई (२०२३)
कथासंग्रह : केमिस्ट्री (२०२२), व्दितीय आवृत्ती : (२०२४ ), साईड इफेक्ट्स ( २०२५).
कादंबरी : द लॉस्ट बॅलन्स (२०२४)
अनुवाद : केमिस्ट्री (२०२५) हिंदी अनुवाद
प्रवास वर्णन : स्मरण महाराष्ट्राचे, निमित्त भटकंतीचे ( लेखसंग्रह )
लाभलेले पुरस्कार :
अंकुर वाङ्मय पुरस्कार, अकोला (२००४), शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार, जुन्नर (२०१६) , कोकण मराठी साहित्य परिषद, कल्याण शाखा आणि अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचा अक्षरगंध पुरस्कार (२०१९), सूर्योदय काव्य पुरस्कार-जळगाव (२०२१), कोमसापचा कवी आरती प्रभू पुरस्कार (२०२२), मराठी वाङ्मय परिषद, बडोदा यांचे उत्कृष्ट कथासंग्रह पारितोषिक (२०२३), शिवानी पब्लिकेशन मुंबई यांचा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार (२०२३). व्यास creation यांचा ज्येष्ठ रत्न पुरस्कार प्रदान..(२०२४), कोकण युवा प्रतिष्ठानचा कोकण साहित्य रत्न पुरस्कार. (२०२४ ). कोमसापचा कथासंग्रहासाठी विशेष साहित्य पुरस्कार (२०२४), पसायदान प्रतिष्ठान, गुहागर यांचा डॉ नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (२०२५), ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा उत्कृष्ट कादंबरीसाठी ॲड वा अ रेगे साहित्य पुरस्कार (२०२५), कादंबरीसाठी कोल्हापूर येथील शब्दांगण साहित्य पुरस्कार (२०२५). उत्कृष्ट कादंबरीसाठी लक्षवेधी साहित्य वलय पुरस्कार (२०२५)
विविध ठिकाणी संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादरीकरण तसेच आकाशवाणी, मुंबई व रेडिओ विश्वास, नाशिक येथे कविता वाचन, कथा वाचन.