Logo
Logo
पूर्वा निखिल धारप यांचे छायाचित्र

पूर्वा निखिल धारप

अल्प परिचय

परिचय - पूर्वा निखिल धारप २८ वर्षे ग्रंथपाल म्हणून नोकरी केल्यानंतर आता स्वेच्छेनं सेवानिवृत्ती घेतली आहे. पुस्तकांच्या सहवासात रहायला आवडतं त्यामुळे मी माझ्या नोकरीचा पुरेपूर आनंद घेतला आणि माणसं जोडण्याची विशेष आवड!!! साहजिकच ग्रंथालय हे असं एक ठिकाण असतं, जिथं सर्व वयाची, विचारांची, आर्थिक, भावनिक, शारीरिक, मानसिक कसलेही मतभेद, असूया, मनात न ठेवता, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सगळेजण म्हटलं तर एकत्र येतात, आणि स्वान्तसुखायताही अनुभवतात. मला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची विशेष आवड आहे, आणि थोडंफार शिक्षणही घेतलं आहे. वाचन, साहित्य यांसोबतच काहीशी लेखनाची आवडही जपते आहे. काही कविता लेखनही केलं आहे.  आकशवाणी मुंबईच्या नाटक विभागत "बी ग्रेड" कलाकार आहे.  आकशवाणी मुंबईच्या "ऐसी अक्षरे रसिके" या कार्यक्रमात स्वलिखित ललितबंधांचे वाचन  आकशवाणीच्या विविध कार्यक्रमात सहभाग, स्वलिखित कवितांचे वाचन  आवाजाच्या माध्यमातून, एप्रिल २०२० मध्ये किस्से लॉक डाऊनचे ही २१ भागांची मालिका सादर केली आहे  २००३ साली वाशी येथे भरलेल्या बौद्ध साहित्य संमेलनासाठी व्हॉइस ओव्हर  फुलपाखरू या मराठी चित्रपटासाठी डबिंग  मराठी तारा वाहिनीसाठी व्हॉइस ओव्हर, डबिंग, प्रोमो लिखाण  तारा वाहिनी वरील "छंदोवती" या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम  रेडिओ स्पॉट्स चे हिंदी ते मराठी अनुवादाचं काम  लिट्ल कृष्णा ह्या हिंदी मालिकेचा मराठी अनुवाद  कार्यक्रमांचे सूत्रसंचालन - विशेषत: संगीत विषयक  अर्चना सहस्त्रबुद्धे लिखित "भाव झंकार" या ऑडिओ पुस्तकाचं संपूर्ण ध्वनिमुद्रण माझ्या आवाजात केलेलं आहे  प्रथम इन्फोटेक या संगणक कंपनीमधील - प्राथमिक संगणक ज्ञान या विषयावरील सर्व ई लर्निंगच्या कामासाठी व्हॉइस ओव्हरचं काम केलं आहे.  सह्याद्री वाहिनीवरील "बोला बोला ट्रिंग ट्रिंग" या कार्यक्रमाच्या ९० भागांच्या संशोधनाचं काम  ठाणे येथील ग गप्पांचा या कार्यक्रमाची सक्रिय सदस्य - कार्यक्रमात ओळख करून देणं, प्रेस नोट लिहिणं, मुलाखत घेणं इत्यादी. https://www.youtube.com/watch?v=MI-rhS7y21M&t=2775s  || सर्व भाषा भारतीय कविता दर्शन || या पुस्तकातल्या एका कवितेचा अनुवाद केला आहे.  इंग्लिश ते मराठी अनुवाद केलेली ३ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.  एका मराठी सिनेमासाठी डबिंगचं काम केलं आहे  साधारण २० वर्षं ते ७० वर्षापर्यंत चे voice modulation करू शकते.  https://www.youtube.com/@poorvadharap7957/video “श्रुतींच्या गावात” हा माझा YouTube Channel आहे, जरूर भेट द्या. https://www.youtube.com/@poorvadharap7957/videos अनुवादित पुस्तके – १. मित्र जोडा आणि प्रभावशाली व्हा २. द 80/20 प्रिन्सिपल ३. चार हजार आठवडे सस्नेह, पूर्वा धारप - 9819267656