Logo
Logo
पराग रघुनाथ लोणकर यांचे छायाचित्र

पराग रघुनाथ लोणकर

अल्प परिचय

लेखक व मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संचालक. गेली ४८ वर्षे मधुश्री प्रकाशन अखंडपणे उत्तमोत्तम साहित्य पुस्तकरूपात प्रकाशित करत आहे. लेखक म्हणून राजू-गोट्याच्या साहसी करामती (विद्यार्थीदशेत लिहिलेले पुस्तक), हॅलो कम्प्युटर, कम्प्युटर डिक्शनरी, हमखास यशस्वी व्हा!, यशाचे खडतर मार्ग, २१ दिवसात यश तुमच्या दारात!, माहीत नसलेला हिटलर, जसं सुचलं तसं!, चहा आणि लेखक अशी ९ पुस्तकं प्रकाशित. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या प्रमुख कार्यवाहपदी कार्यरत. प्रकाशक संघाच्या माध्यमातून साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि एकूणच मराठी भाषा आणि मराठी साहित्य संस्कृतीच्या प्रसार, प्रचार आणि उत्कर्षासाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांत सक्रीय सहभाग.