प्रोफाइल लोड करत आहे...
नारायण वामन टिळक
अल्प परिचय
नारायण वामन टिळक जन्मापासून वयाच्या नवव्या वर्षापर्यंत कोकणात आजोळी करजगावला राहत होते. शिकण्यासाठी ते कल्याणला आणि नाशिकला आले. पहिल्या चार इयत्ता व इंग्रजीचे थोडे शिक्षण पार
पडल्यावर त्यांनी नाशिक येथील गणेश शास्त्र्यांकडे संस्कृतचे शिक्षण आठ वर्षे घेतले. गणेशशास्त्री लेले व्युत्पन्न पंडित होते. कालिदासाच्या मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय नाटकांची मराठी भाषांतरे त्यांनी केली होती. काव्यशास्त्र पुस्तक लिहिले होते. सरदार विंचुरकरांनी केलेल्या तीर्थयात्रांच्या टिपणांच्या व डायऱ्यांच्या आधाराने लेल्यांनी 'तीर्थयात्राप्रबंध' नावाचे प्रवासवर्णन मराठी भाषेत विंचुरकरांसाठी लिहिले होते. त्यांनी टिळकांना जुन्या परंपरागत पद्धतीने संस्कृत शिकवले. व्याकरण, काव्य, नाटक, धातुरूपावली, अमरकोश इ. पण त्याचा टिळकांवर इतका खोलवर संस्कार झाला की टिळक काव्यात रमू लागले. वयाच्या १८व्या वर्षी (१८७९) टिळकांचे लग्न झाले आणि त्यांचा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न
सुरू झाला. त्यांनी नाशिक सोडले आणि खानदेश, वऱ्हाड, पुणे, मुंबई, कल्याणजवळचे मुरबाड, नाशिकजवळ वणी (सप्तशृंगीचे ठिकाण) ह्या ठिकाणी पुराणिक प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षक असे व्यवसाय
करून उदरनिर्वाह केला. ह्या भटकंतीतच त्यांना लोकांचा विविध तऱ्हेचा अनुभव आला. समाजाच्या वृत्ति प्रवृत्तींचे जवळून दर्शन झाले. १८९९ मध्ये, वयाच्या तिशीत त्यांच्या आयुष्यात एक निराळाच योग आला नागपूरच्या सरदार बुटींनी त्यांना बोलावले ते वेद, उपनिषदे इत्यादी संस्कृत ग्रंथांचे संशोधन आणि संपादन करण्यासाठी! इथेच ते सरदार बुटींसमोर वेदान्तविचाराचे निरूपण व विश्लेषण करू लागले. त्याच वेळी 'ऋषी' या नियतकालिकाचे संपादन करून त्यात ते लेखनही करीत असत. त्याच वेळी केशवसुतही नागपूरला होते. टिळकांचा संबंध त्यांच्याशी आला. दोघेही काव्याचे भोक्ते ! केशवसुतांच्या वाचनात 'दि गोल्डन ट्रेझरी' असे. काव्य, काव्यनिर्मिती त्यांवर दोघांचे बोलणे होई. दोघेही कविता करू लागले होते, त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या कवितेसाठी हा सहवास प्रेरक ठरला. केशवसुतांवर टिळकांच्या विचारांचा, रचनेचा थोडासा प्रभावही पडला. टिळक पुढे नोकरीसाठी नागपूर सोडून राजनांदगावला आले. तिथे जात असताना प्रवासात एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी गाठ पडली. बोलताना त्या धर्मोपदेशकाने ख्रिस्ती धर्माबद्दल विचार मांडले. टिळकांच्या मनात नवधर्माच्या स्थापनेबद्दल जे विचार होते, ते त्यांनी बोलण्याच्या ओघात मांडले. ते ऐकून 'तुम्ही लवकरच ख्रिस्ती होणार' हे भाकीत त्या धर्मोपदेशकाने मांडले. पण टिळकांनी स्वच्छ नकार दिला; वादविवाद, विरोध केला. पण अंतरी मात्र ते बोलणे घोळत राहिले. 'झेंडूची फुले' हा अत्रे यांचा अजरामर ठरलेला विडंबन कवितासंग्रह म्हणजे रविकिरण मंडळाची कवितेच्या अंगाने काव्यभाषेत केलेली समीक्षा आहे. 'मी कसा झालो' हे अत्रे यांचे आत्मचरित्रात्मक लेखन १९५३ पर्यंतच्या काळातील अत्र्यांच्या जीवनाचे प्रत्ययकारी व नाट्यपूर्ण असे दर्शन घडविते. 'कऱ्हेचे पाणी' या आत्मचरित्रात्मक खंडांतून त्यांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन स्वरूपाचा धावता आलेख रेखाटला आहे. सामान्य माणूस मोठी कामगिरी कशी करू शकतो, हे वाचकांच्या मनावर ठसविण्यासाठी त्यांनी हे लेखन केले आहे. त्यांच्या ठायी असणारे सामर्थ्य आणि काय हवे, काय नको; ते रोखठोकपणे सांगणारी पारदर्शी शैली प्रकटते. 'फुलांची ओंजळ', 'बहिणाबाई चौधरी यांच्या कविता', दि. वि. देव संपादित 'उपहासिनी' या काव्यसंग्रहाची प्रस्तावना, 'संपूर्ण गडकरी' व 'अप्रकाशित गडकरी' या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना या दृष्टीने विशेष उल्लेखनीय ठरतात., 'गुत्त्यात नारद', 'बँडीची बाटली', 'बाजारात तुरी', 'सार्वजनिक जीवन', 'पहिले कावळे संमेलन', 'गांधीवादी पाहुणे' यांसारख्या त्यांच्या विनोदी कथा, कथेचा प्रकृतिधर्म सांभाळणाऱ्या आहेत. वेधक आरंभ, कृतिप्रधान प्रसंग, पृथगात्म पात्रनिर्मिती, चित्रदर्शी मांडणी, प्रसंगनिष्ठ व शब्दनिष्ठ विनोदातील सहजता व कलाटणीपूर्ण अंत अशा स्वरूपात अत्रे यांच्या कथा साकार होतात. अत्रे यांनी केलेले व्यक्तिगौरवप्रधान लेखन मराठी साहित्येतिहासात अपवादाभूत म्हणावे लागेल.