Logo
Logo

नन्दिनी दिवाण

अल्प परिचय

डॉक्टर दिवाण यांनी मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयात एम.ए, एम.फिल केलं असून ph.d देखील केलं आहे. त्या रुपारेल महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. स्त्रियांचे सामाजिकीकरण, बदलत्या भूमिका आणि भावना, मानसिक स्वास्थ्य आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यास तंत्र हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. मानसशास्त्रज्ञ म्हणून रेडिओ, टीवीवरील विविध कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून सहभागी असतात. त्या मानसशास्त्र या विषयावर व्याख्यानं, गटचर्चा आणि कार्यशाळा यांचं आयोजन करतात. मुंबई विद्यापीठाचा २०१२ सालचा 'श्रीमंत सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार' त्यांना प्राप्त झाला आहे. प्रकाशित साहित्य: 'बदलत्या मनोभूमिका' ( रोहन प्रकाशन , १ ९९ ७ ) (मराठी मानसशास्त्र परिषदेच्या पुस्तक स्पर्धेत पुरस्कार - नोव्हेंबर २०००) एक आरसा स्त्रियांसाठी ( स्त्री - मुक्ती संघटना प्रकाशन ,२०००) बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्राविषयी पाठ्यपुस्तकं