Logo
Logo

मेघना मोरेश्वर पेठे

अल्प परिचय

मेघना पेठे (जन्म ४ डिसेंबर १९५८, जन्म: मुंबई) मेघना पेठे या मराठी कादंबरी व कथाकार आहेत.त्यांनी आपल्या लेखनाची सुरूवात कवितांनी केली पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा व कादंबरी लेखनाकडे वळल्या. मेघना मोरेश्वर पेठे या अत्यंत धीटपणे आणि पारदर्शकतेने स्त्रियांचं मनोविश्व आणि भावना मांडणाऱ्या, एक अत्यंत सडेतोड विचारांच्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. समाजमानसांत ‘टॅबू’ असणाऱ्या विषयांचा (लैंगिकता आणि नैतिकता) बागुलबुवा उभा करून कुजबुजत बोलण्याच्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कथांमधली पात्रं बिनधास्त भाष्य करून जातात. त्यांचा ‘हंस अकेला’ (१९९७) कथासंग्रह खूप गाजला, तो कथांच्या वेगळेपणामुळे. ‘आंधळ्यांच्या गायी’ (२०००) हा दुसरा कथासंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण ठरला. समाज, कुटुंबरचना, संस्कृतिमूल्ये, नैतिकता आणि व्यक्तिमन यांत गुरफटणारे, धडपडणारे नातेसंबंध वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कथांत येतात. हे संबंध थेट आणि धीटपणे त्या मांडतात.