प्रोफाइल लोड करत आहे...
क्षितिज देसाई
अल्प परिचय
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून कथा प्रकाशित. वय सतरा असताना (सन २०१०) 'साप्ताहिक सकाळ'च्या महत्वाच्या कथास्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक- ज्यात माधव गवाणकर, भा. ल. महाबळ यांसारखे मान्यवर लेखक सहभागी होते.
*प्रकाशित पुस्तके* (छात्र प्रबोधन मासिकात पूर्वप्रसिद्ध झालेल्या विज्ञानकथांचे संग्रह)
१.सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस, (२०१९) अक्षर मानव प्रकाशन
२. शीतपेटीतून जेव्हा जाग येते (२०२५) सृजनसंवाद प्रकाशन
*पारितोषिके* (विज्ञानेतर कथा)
१. “उधारी” - साप्ताहिक सकाळ कथास्पर्धा २०१०, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
२. “चिमुरडी” - मेनका कथास्पर्धा २०१८, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
३. “बिनमोबाईलचा माणूस” - संवादसेतू कथास्पर्धा २०२३, 'सर्वोकृष्ट कथा' वसंत नरहर फेणे पारितोषिक
*संकीर्ण*
१. डॉ. नलिनी गुजराथी संपादित ५ लेखकांच्या विज्ञानकथांचा संग्रह 'सफर विज्ञानकथांची' या पुस्तकात कथेचा समावेश. (२०१७) सोबतचे इतर मान्यवर लेखक: डॉ. जयंत नारळीकर, डॉ. संजय ढोले, गजानन क्षीरसागर, मुकुंद जोगळेकर.
२. अनघा जलतरे व कल्याणी पाटील यांच्यातर्फे दोन कथांचे इंग्रजी अनुवाद प्रकाशित.
*व्यक्तिगत*
शिक्षण: बीई कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
व्यवसाय: खासगी कंपनीत लीड क्यूए इंजिनीअर