प्रोफाइल लोड करत आहे...
केतकी मोडक
अल्प परिचय
डॉ. केतकी मोडक या मराठीतील लेखिका आणि अनुवादक आहेत, त्या संतसाहित्याच्या अभ्यासक आहेत. त्या मराठी भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्यांनी इतिहासलेखन केले आहे.
श्रीअरविंद सोसायटी, पुडुचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या 'अभीप्सा' या मासिकाच्या जानेवारी २०१८ पासून त्या संपादिका आहेत. या मासिकामध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या इंग्रजी साहित्याचा अनुवाद प्रकाशित केला जातो.
इ.स. २००५ साली प्रकाशित झालेल्या 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई: व्यक्ती आणि वाङ्मय)' या संशोधन ग्रंथात संत मुक्ताबाईंच्या जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङ्मय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे. या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, इतिहास संशोधन मंडळ, संगमनेर आणि ज्ञानप्रबोधिनी (निगडी) या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ.मोडक यांची उपयोजित मराठी आणि ध्यासपंथे चालता (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.