Logo
Logo
हमीद दाभोलकर यांचे छायाचित्र

हमीद दाभोलकर

अल्प परिचय

एमबीबीएस, डीएनबी (मनोविकारशास्त्र) * `परिवर्तन' ह्या संस्थेमध्ये संचालक-मनोविकारतज्ज्ञ म्हणून गेली पंधरा वर्षे कार्यरत. * `मानसरंग' या मानसिक आरोग्य संवादासाठी कलेचा वापर करणार्‍या अभिनव, प्रबोधन आणि उपचारपद्धतीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा सहभाग. * मानसिक आरोग्य प्रबोधन आणि प्रशिक्षण यासाठी दहापेक्षा अधिक लघुपटांची निर्मिती. *`मानसमैत्री' या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवकांचे भावनिक प्रथमोपचार याविषयी प्रशिक्षण. * `किमया कॅफे' : तीव्र मानसिक आजाराशी झुंजणार्‍या रुग्ण आणि नातेवाईक यांनी चालवलेल्या कॅफेची निर्मिती. पुणे आणि तेजपूर येथे असे कॅफे चालवले जातात. * THRIVE या उपक्रमाच्या अंतर्गत स्किझोफ्रेनियासारख्या तीव्र मानसिक आजार असलेल्या दोनशेपेक्षा अधिक रुग्णांना अर्थपूर्ण रोजगाराची उपलब्धी. * ‘स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त व्यक्तींचे समाजाभिमुख पुनर्वसन’ याविषयी `लॅन्सेट' या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधाचे सहलेखक. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध. * सैलानी बाबा दर्गा (बुलढाणा) येथील मनोरुग्णांना आधुनिक मानसिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी `दवा-दुवा प्रकल्पा'मार्फत कार्यरत. * डिप्रेशन, चिंता आणि दारूचे व्यसन या मानसिक आजारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर उपचार उपलब्ध करून देणार्‍या पथदर्शी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी. * सातारा (महाराष्ट्र), तेजपूर (आसाम) आणि इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथील व्यसनमुक्ती केंद्रांतून आज अखेर पंधरा हजारान्पेक्षा अधिक लोकांना दारू आणि अफूच्या व्यसनमुक्तीच्या सुविधा देणार्‍या केंद्रांचे मुख्य समन्वयक. * `महाराष्ट्र अंनिस'मार्फत भारतातील पहिल्या करणी भानामती उपचार केंद्राची स्थापना. * महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका लीड महाविद्यालयात युवकांच्या मानसिक आरोग्यविषयक कार्यरत असलेल्या `युवा मानसरंग' या पथदर्शी प्रकल्पाचा समन्वय. * `महाराष्ट्र अंनिस'चे राज्यकार्यकारी समिती सदस्य. * `साधना ट्रस्ट'चे विश्वस्त. * डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत `प्रश्न मनाचे' या पुस्तकाचे लेखन. * `विवेकाच्या वाटेवर' या पुस्तकाला राज्यशासनाचा पुरस्कार.