Logo
Logo
दीनानाथ मनोहर यांचे छायाचित्र

दीनानाथ मनोहर

अल्प परिचय

दीनानाथ मनोहर (जन्मदिनांक २२-९-४०) हे मराठी कादंबरी व कथाकार आहेत. *** प्रकाशित साहित्य * आंदोलन - कादंबरी - ग्रंथाली प्रकाशन * ऐल ते पैल - कथा संग्रह - मधुरा प्रकाशन * कबीरा खडा बाजार में - कादंबरी - लोकवाङमय गृह * प्रदेश साकल्याचा - कादंबरी - मुद्रा प्रकाशन * मन्वंतर - कादंबरी - राजहंस प्रकाशन * रोबो - कादंबरी - ग्रंथाली प्रकाशन २०१२ * सीमान्त - कादंबरी - ग्रंथाली प्रकाशन *** ई-पुस्तके दीनानाथ मनोहर यांची ‘रोबो’ ही कादंबरी ग्रंथालीच्या स्थापनेच्या वेळी १९७५ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या तीन पुस्तकांपकी एक आहे. त्यानंतर दीनानाथ मनोहर यांच्या बऱ्याच कादंबऱ्या आल्या. रोबोचे पुनर्मुद्रण व्हावं अशी दीनानाथ मनोहरांची खूप इच्छा होती. पण अनेक कारणांनी ते होत नव्हते. शेवटी ई साहित्याने तीन वर्षांपूर्वी ती पीडीएफ ई-पुस्तक म्हणून काढली आणि ती पुन्हा प्रकाशात आली. त्यानंतर ती मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावली. त्यापाठोपाठ शब्द प्रकाशनाने रोबो छापलीदेखील. आता दीनानाथ मनोहरांनी आपली आत्तापर्यंतची सर्व प्रकाशित म्हणजे आठ पुस्तके ई पुस्तक स्वरूपात काढायचे ठरवले असून ती हलन्त प्रकाशित करीत आहे. *** पुरस्कार व गौरव * अध्यक्ष, तिसरे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, नांदेड, इ.स. २०११ * शब्द द बुक गॅलरी‘चा भाऊ पाध्ये साहित्यगौरव शब्द पुरस्कार‘ (एप्रिल २०१३)