प्रोफाइल लोड करत आहे...
चंद्रकला कुलकर्णी
अल्प परिचय
*** चंद्रकला कुलकर्णी
* बीड जिल्यातील नागपिंपरी हे त्यांचे मूळ गाव.
* वडील की. नारायणराव कुलकर्णी हे स्वातंत्र्यसैनिक होते.
* त्या इतिहासात एम. ए. असून भूगोल हाही त्यांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे.
* गुजराथी हायस्कूल, नांदेड येथे त्यांनी इतिहास व भूगोलाच्या अध्यापनाचे कार्य केले.
* एका अभ्यासू, प्रामाणिक व विद्यार्थी प्रिय शिक्षिका ही त्यांची ओळख.
* सेवानिवृत्तीनंतर चंद्रकला कुलकर्णी वाचन व लेखन या आवडीच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देत आहेत.
* त्यांच्या कथा व इतर लेखन विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे.
* अंतरीचा दिवा हा त्यांचा पहिला कथासंग्रह २०१० मध्ये प्रकाशित झाला.
* एल. के. कुलकर्णी यांच्या 'भूगोलकोशा' च्या लेखनात चंद्रकला कुलकर्णी यांचाही सहभाग होता.