Logo
Logo

भीमराव रामजी आंबेडकर

अल्प परिचय

अफाट बुद्धिमत्ता, सर्वांगीण व्यासंग, असीम ग्रंथप्रेम आणि प्रचंड ज्ञानलालसा यांच्या जोरावर मिळविलेले सर्व यश डॉ. आंबेडकरांनी भारतातील जातिनिर्मूलनाच्या व दलितांच्या उद्धाराच्या कारणी लावले. १९३६ मध्ये त्यांचे 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट्स' हे न होऊ शकलेले भाषण पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. १३ ऑक्टोबर १९४६ रोजी 'हू वेअर द शूद्राज ?' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा सपत्नीक घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना स्वहस्ते बौद्ध धर्माची दीक्षा देऊन स्वतः तयार केलेल्या बावीस प्रतिज्ञा त्यांच्याकडून वदवून घेतल्या. या घटनेने भारतीय राजकारणाला व समाजकारणाला क्रांतिकारक वळण लागले. दलितांच्या ठिकाणी आत्मसन्मानाची व दलितेतरांच्या ठिकाणी आत्मपरीक्षणाची भावना उत्पन्न झाली. तसेच आपल्या सामाजिक इतिहासाचे वस्तुस्थितिजनक चित्र पाहण्याची निकडही त्यामुळेच समाजधुरीणांना जाणवली. या सर्वांमधूनच आंबेडकरी चळवळ व दलित साहित्य यांचे युग अवतरले. डॉ. आंबेडकर ह्यांचे कार्यकर्तृत्व आणि विचार हेच या समाजघटकांसाठी साहित्यप्रेरणा बनले. यामुळे दलित साहित्याला आंबेडकरी चळवळीचे साहित्य असेही म्हणता येते. आपल्या ६५ वर्षांच्या आयुष्यात डॉ. आंबेडकरांनी इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा ह्या ज्ञानक्षेत्रांतील विविध विषयांवर प्रचंड लेखन केले. त्यांच्या या लेखनातून त्यांच्या प्रगाढ बुद्धिमत्तेचा,सर्वस्पर्शी प्रतिभेचा, अपरंपार समाजविषयक तळमळीचा व लढाऊ राजकीय ध्येयधोरणांचा विस्मयजनक प्रत्यय येतो. भारतीय समाजाच्या पारंपरिक जडणघडणीचे त्यांना असणारे आकलन जसे त्यांच्या वाङ्मयातून प्रकट होते, तसेच कालानुरूप सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची जिद्दही त्यातून व्यक्त होते. शतकानुशतके केवळ अन्याय व अवहेलना यांचेच धनी असणाऱ्या आपल्या दलित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी आमरण कष्ट उसपले आणि आपले विचार भाषणांतून व लेखनांतून तळमळीने मांडले. भारताच्या सामाजिक वास्तवाची सूक्ष्म व सखोल जाण असणाऱ्या डॉ. आंबेडकरांना बदलत्या काळानुरूप समाजपरिवर्तन घडवून आणण्याची अनिवार ओढ लागली होती. त्यांचे सर्व लेखन त्या प्रेरणेनेच घडले. डॉ. आंबेडकरांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांत लेखन केले. 'प्रॉब्लेम ऑफ दि रूपी' (१९२३), 'थॉट्स ऑन पाकिस्तान' (१९४०), 'दि अनटचेबल्स' (१९४९), 'हू वेअर द शूद्राज' हे ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेचे व व्यासंगाचे निदर्शक होत. ‘दि बुद्धा ॲन्ड हिज धम्मा' (१९५७) हा त्यांचा ग्रंथ बौद्ध धर्माचा स्वतंत्र अन्वयार्थ लावणारा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे. त्यांचे मराठीतील बहुतेक सर्व लेखन ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत' व 'जनता' या नियतकालिकांतून झाले आहे. त्यांच्या मराठी भाषणांचा संग्रह महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र खंडांत प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या लेखनातून मराठी वैचारिक निबंधवाङ्मयाचे समृद्ध असे रूप दृष्टीस पडते. समाजपरिवर्तनासाठी साहित्यनिर्मिती डॉ. आंबेडकर यांच्या लेखांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांची आशयसंपन्नता होय. आपल्या ६५ वर्षांच्या आयुष्यात डॉ. आंबेडकरांनी इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा ह्या ज्ञानक्षेत्रांतील विविध विषयांवर प्रचंड लेखन केले. त्यांच्या या लेखनातून त्यांच्या प्रगाढ बुद्धिमत्तेचा,सर्वस्पर्शी प्रतिभेचा, अपरंपार समाजविषयक तळमळीचा व लढाऊ राजकीय ध्येयधोरणांचा विस्मयजनक प्रत्यय येतो. भारतीय समाजाच्या पारंपरिक जडणघडणीचे त्यांना असणारे आकलन जसे त्यांच्या वाङ्मयातून प्रकट होते, तसेच कालानुरूप सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची जिद्दही त्यातून व्यक्त होते. 'भारताच्या झंझावाताने हिंदुसमाजात एक प्रकारचे तुफान आले आहे'शतकानुशतके केवळ अन्याय व अवहेलना यांचेच धनी असणाऱ्या आपल्या दलित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी आमरण कष्ट उसपले आणि आपले विचार भाषणांतून व लेखनांतून तळमळीने मांडले. भारताच्या सामाजिक वास्तवाची सूक्ष्म व सखोल जाण असणाऱ्या डॉ. आंबेडकरांना बदलत्या काळानुरूप समाजपरिवर्तन घडवून आणण्याची अनिवार ओढ लागली होती. त्यांचे सर्व लेखन त्या प्रेरणेनेच घडले. 'डॉ.आंबेडकरांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांत लेखन केले. 'प्रॉब्लेम ऑफ दि रूपी' (१९२३), 'थॉट्स ऑन पाकिस्तान' (१९४०), 'दि अनटचेबल्स' (१९४९), 'हू वेअर द शूद्राज' हे ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेचे व व्यासंगाचे निदर्शक होत. ‘दि बुद्धा ॲन्ड हिज धम्मा' (१९५७) हा त्यांचा ग्रंथ बौद्ध धर्माचा स्वतंत्र अन्वयार्थ लावणारा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे. त्यांचे मराठीतील बहुतेक सर्व लेखन ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत' व 'जनता' या नियतकालिकांतून झाले आहे. त्यांच्या मराठी भाषणांचा संग्रह महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र खंडांत प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या लेखनातून मराठी वैचारिक निबंधवाङ्मयाचे समृद्ध असे रूप दृष्टीस पडते.