Logo
Logo
भास्कर चंदावरकर यांचे छायाचित्र

भास्कर चंदावरकर

अल्प परिचय

भास्कर चंदावरकर (जन्म : पुणे, १६ मार्च १९३६; - पुणे, २६ जुलै २००९) हे एक भारतीय संगीतकार आणि संगीताच्या परंपरांचे अभ्यासक होते. * विचारमूलक संगीतसाधना हा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य गाभा होता. संगीतासंदर्भात त्यांनी केलेले तात्त्विक विवेचन आजही प्रमाण मानले जाते. स्पष्ट आणि परखड विचार, हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. * त्यांनी २००४ साली नंदिनी संन्याल यांच्या स्मरणार्थ झालेल्या व्याख्यानमालेत `चित्रपट संगीत' या विषयावर भाषण केले होते. *** ग्रंथलेखन प्रयोगशील संगीतरचनाकार, सतारवादक आणि विचारवंत पंडित भास्कर चंदावरकर यांनी संगीतावरील विचारमूलक विवेचन असणारा ‘चित्रभास्कर’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. चंदावरकर यांनी लिहिलेल्या संगीतविषयक निबंधांचा एकत्रित समावेश या ग्रंथात आहे. *** भास्कर चंदावरकर यांचे संगीत असलेले चित्रपट * अरविंद देसाई की अजब दास्तॉं * अल्बर्ट पिंटोको गुस्सा क्यूं आता है * कैरी * घाशीराम कोतवाल (नाटक) * खंडहर (हिंदी) * जय जवान जय मकान * थोडासा रुमानी हो जायें * बायो * भक्त पुंडलीक * माती माय * मायादर्पण * मायामृग (हिंदी) * रावसाहेब * वंशवृक्ष * सरीवर सरी * सर्वसाक्षी (हिंदी) * सामना