प्रोफाइल लोड करत आहे...
आशुतोष प्रकाश जावडेकर
अल्प परिचय
संगीत, साहित्य, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये लीलया मुशाफिरी करणारं तरुण व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. आशुतोष जावडेकर यांची ख्याती आहे. त्यांनी दंतवैद्यकाची पदवी घेतलेली असली तरी त्यासोबतच त्यांनी इंग्रजी साहित्यात प्रथम क्रमांकासह एम.ए केलं आहे. डिस्कोर्स समीक्षा व स्थलांतर वाङ्मय हे प्रधान अभ्यासविषय असून त्यावरील त्यांचा इंग्रजी शोधनिबंध प्रसिद्ध आहे. संगीतविषयक पुस्तकांबरोबर त्यांनी कादंबरीलेखन केलं असून या पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत. याशिवाय त्यांनी संगीतकार व गायक म्हणून तीन संगीत व्हिडिओंची निर्मिती केली आहे. मुंबई विद्यापीठ, मदुरा कॉलेज (मदुराई), आयआयएएस (सिमला) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) इत्यादी ठिकाणी इंग्रजीमध्ये साहित्य विषयावर प्रमुख.
* इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांकासह एम. ए. (पुणे विद्यापीठ)
* 'नवे सूर अन नवे तराणे' बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक.
* मुळारंभ : जागतिकीकरणाचा आरंभ आणि तत्कालीन तरुण पिढी यांवर भास्य करणारी कादंबरी.
* अखिल भारतीय साहित्य सामेलानासारख्या अनेक व्यासपीठांवर कविता आणि गाण्यांचे सादरीकरण.
* डिस्कोर्स समीक्षा व स्थलांतर वाड.मय हे प्रमुख अभ्यासाविषय, त्यावरील इंग्रजी शोधनिबंध प्रसिध्द.
* अनेक मराठी, इंग्रजी लघुपट व एकांकिका यांच्यासाठी संगीत दिग्दर्शन.
* 'ही पृथ्वी माझी' या आकाशवाणीच्या मालिकेच्या शीर्षकगीताचे संगीत दिग्दर्शन.
* अर्धे कच्चे अर्धे पक्के हे गाणे व्हिडीओसह प्रसिद्ध.
* साम, आय.बी.एन. लोकमत इ. वाहिन्यांवर मुलाखती, परिसंवादात सहभाग.
* शब्द प्रवासिनींचे : लेखिकांच्या प्रवासवर्णनांची समीक्षा 'मिळून सा-याजणी' या मासिकातील सदर
*** पुरस्कार
* 'नवे सूर अन नवे तराणे' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा समीक्षेचा फुलंब्रीकर पुरस्कार.
* मुळारंभ - सार्वजनिक ग्रंथालय, नाशिक आणि पै फ्रेंड्स ग्रंथालय यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट कादंबरी २०१४ चा