Logo
Logo
अरुण मार्तंडराव साधू यांचे छायाचित्र

अरुण मार्तंडराव साधू

अल्प परिचय

मुंबई दिनांक', 'सिंहासन' ,'तडजोड', 'त्रिशंकू', 'मुखवटा' इत्यादी सत्तेच्या राजकारणाच्या आणि बदलत्या समाजकारणाचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या गाजलेल्या कादंबर्यांरचे लेखक म्हणजे अरुण साधू. 'इंडियन एक्सप्रेस', 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव घेतला होता. त्यांची साम्यवादी क्रांतिकारकांवरची ललितेतर पुस्तकंही विशेष गाजली. त्यांनी 'डॉक्टर आंबेडकर' व 'यशवंतराव चव्हाण' यांच्या चरित्रपटांसाठी संवाद व पटकथालेखन केलं. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं तसंच त्यांना साहित्य अकदमी पुरस्कारही मिळाला होता.