Logo
Logo
अरुण मांडे यांचे छायाचित्र

अरुण मांडे

अल्प परिचय

डॉ.अरुण विनायक मांडे हे अहमदनगर येथे स्थायिक असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. * डॉ. अरुण मांडे यांना प्रदूषण या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९८९-९० * गुणसूत्र या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९९५-९६ मिऴाला आहे. * एकांकिका लेखनासाठी नाट्यदर्पण प्रतिष्ठान पुरस्कार १९९२-९३ मिळाला आहे. * विज्ञान गमती या पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार १९९४-९५, * अमाणूस या विज्ञानकथा संग्रहाला स्व. मामा कडलक साहित्य पुरस्कार १९९८, *** पुणे विद्यापीठ चिपळूणकर विज्ञान पुरस्कार, आपट्याचं पान या कादंबरीला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे * पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील पुरस्कार २००८, * संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी पुरस्कार २००८, * अहमदनगर जिल्हा वाचनालय पुरस्कार २००९, * पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार २००९, * डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे व श्रीमती ऋतबाई हिवाळे पुरस्कार २००८-०९, * अनघा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे कादंबरी पुरस्कार २०१०. * महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा म.ना. गोगटे पुरस्कृत गो.रा. परांजपे वार्षिक ग्रंथकार पुरस्कार २०१०. * वर्तमानपत्रात आरोग्यविषयक स्तंभलेखन. कथासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद अशी मिळून एकंदर ४० पुस्तके प्रकाशित. *** डॉ. अरुण मांडे यांची आरोग्यविषयक भाषांतरित पुस्तके * अर्धशिशी अर्थात्‌ मायग्रेन आणि डोकेदुखी (मूळ लेखक डॉ. जोसेफ कॅन्डेल व डॉ. डेव्हिड सुडेर्थ) * आरोग्यदायी जीवनसत्त्वे (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू) * आहाराद्वारे उपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू) * कॅन्सर आणि निसर्गोपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू) * गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय) * चार आठवड्यात वजन कमी करा (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन) * चाला... 'फिट' राहा (मूळ लेखक मॅगी हम्फेरीस व लेस स्नोडॉन) * तणावमुक्त जगण्यासाठी (मूळ लेखक डॉ. ख्रिश्चन श्रायनर) * निसर्गोपचार लहान मुलांच्या आजारासाठी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू) * निसर्गोपचारे मधुमेहावर नियंत्रण (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू) * नैसर्गिक सौंदर्यसाधना (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू) * पाठदुखी विसरा (मूळ लेखक डॉ. ए.पी. सिंग व डॉ. यतीश अगरवाल) * फिटनेस मंत्र-टीन एजर्ससाठी (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन) * बहुगुणी वनौषधी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू) * योगिक प्राणायाम (मूळ लेखक डॉ. के.एस. जोशी) * वयावर मात (मूळ लेखक डॉ. पॉल गालब्रेथ) * संगोपन बाळ-गोपाळांचे (मूळ लेखक डॉ. सुभाष आर्य) * सुजाण संगोपन (मूळ लेखक डॉ.उमेश शर्मा) * हार्ट अटॅक आणि सुखी जीवन (मूळ लेखक डॉ. टॉम स्मिथ) * हील युवर बॉडी (मूळ लेखक लुईस एल. हे ) * हृदय-स्वास्थ्य (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय)