Logo
Logo
आनंद हर्डीकर यांचे छायाचित्र

आनंद हर्डीकर

अल्प परिचय

जन्मतारीख २९ सप्टेंबर १९४७ शिक्षण : एम. ए. (इतिहास) *** कार्यानुभव * १९६९ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून आजपर्यंत सुमारे २३०० लेख प्रसिध्द. * संपादकीय कामाचा विविधांगी अनुभव. विमुक्त पत्रकार या नात्याने विविध नियकालिकांप्रमाणेच सुमारे १०० स्मरणिकांचे संपादन. *** ७ स्वतंत्र पुस्तकांचे लेखन * गांधी, अशोक आणि राष्ट्राघात - १९६९ (विजयंता प्रकाशन) * जय बांगला, सोनार बांगला - १९७२ (विजयंता प्रकाशन) * अंतहीन संघर्ष - १९७४ (श्री प्रकाशन) * काळा हिटलर - १९७८ (श्रीविद्या प्रकाशन) * शापित पंजाब - १९८६ (चंद्रकला प्रकाशन) * लोकोत्तर जीवनव्रती - १९९८ (अमृतसिध्दी प्रकाशन) * कायदेआझम - २००५ (राजहंस प्रकाशन) *** ४ अनुवादित पुस्तके * दि आर.एस.एस.स्टोरी : मूळ लेखक : के.आर. मलकानी * हिंदू कलादृष्टी (संस्कार भारती कशासाठी?) - मूळ लेखक - दत्तोपंत ठेंगडी * कारगिलचे अपराधी कोण ? मूळ लेखक - अधीशकुमार * देश माझा, मी देशाचा : मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी (पुस्तकातील एक भाग) * महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने * २००३ पासून ‘राजहंस प्रकाशना’त संपादक म्हणून कार्यरत. आतापर्यंत १२५ हूनही अधिक पुस्तकांचे संपादन.