Logo
Logo
अंबरीश मिश्र यांचे छायाचित्र

अंबरीश मिश्र

अल्प परिचय

जन्म, शिक्षण मुंबईत. * काही काळ आकाशवाणी, मुंबई केंद्रात उमेदवारी. १९७५ सालापासून इंग्रजी पत्रसृष्टीत. * क्लॅरिटी, बाँबे, द डेली, द इण्डिअन पोस्ट, सण्डे ऑब्र्जर्व्हर, द इण्डिपेन्डेन्ट या वृत्तपत्रांत बातमीदारी. * गेली सत्तावीस वर्षं द टाइम्स ऑफ इण्डियाच्या मुंबई आवृत्तीत कार्यरत. * मौज, माणूस, सत्यकथा, अक्षर, दीपावली ह्या दिवाळी अंकांत नियमित ललित लेखन. *** प्रकाशित पुस्तके * शुभ्र काही जीवघेणे, * गंगेमध्ये गगन वितळले, * सुंदर ती दुसरी दुनिया, * दरवळे इथे सुवास हे ललित लेखसंग्रह *** कवितासंग्रह * अलख * गुलजारजींच्या उर्दू कथांचा तसेच त्यांच्या मिर्झा गालिब या चरित्राचा मराठी अनुवाद केला आहे. * विजया मेहता यांच्या झिम्मा ह्या आत्मचरित्रात लेखन व संपादन सहाय्य. * विजयाबाईंच्या कलाकीर्दीचा आढावा घेणाऱ्या बाई या ग्रंथाचं संपादन. *** पुरस्कार * राज्य शासन, * महाराष्ट्र फौंडेशन, * मुंबई मराठी साहित्य संघ, * मुंबई मराठी पत्रकार संघ, * इचलकरंजी सार्वजनिक वाचनालय, * कोल्हापूरचा रणजित देसाई, * पुण्याचा गो. नी. दांडेकर, * गोपीनाथ पाटील, * मराठी नाट्य परिषद