प्रोफाइल लोड करत आहे...
अमरनाथ सिंग
अल्प परिचय
'सृजन' त्रैमासिकाचा कार्यकारी संपादक. विविध दैनिके, नियतकालिके आणि वेबपोर्टल्ससाठी नियमित लेखन. साहित्य, समाज, संस्कृती, राजकारण आणि इतिहास हे माझ्या लेखनाचे प्रमुख विषय.
आईचा जन्म लाहोरचा. फाळणीच्या दंगलीत जीव वाचवून आजोळचा कुटुंब-कबिला हरियाणाच्या पानिपत या गावी आला. पुढे पन्नासच्या दशकात रोजगाराच्या शोधात आई-वडील महाराष्ट्रात आले. माझा जन्म १९६६ साली वैतरणानगर, नाशिक येथे झाला. औपचारिक शिक्षणापेक्षा जीवनशिक्षणाने मला घडवलं. जीवनाच्या पाठशाळेत ठोकरा खात-खात ते मिळत गेलं.
कामगार चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जवळपास एक दशक, तर कलाकार आणि सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून आणखी एक दशक सक्रिय काम. जीवनानुभव, सामाजिक चळवळी आणि प्रत्यक्ष काम यामधूनच वैचारिक जडणघडण झाली. लेखनाशिवाय दृक-श्राव्य माध्यमात सक्रिय. विविध लघुपट माहितीपटांच्या निर्मितीतीत सहभाग. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत लेखन, त्याशिवाय मराठी-हिन्दी या भाषांमधील अनुवादक.