Logo
Logo

सुनील गोपाळराव शिनखेडे

अल्प परिचय

एम. ए. एम. फिल्. (मराठी वाङ्मय) नागपूर विद्यापीठ. १९८७ लेखक, कवी, वक्ता. वास्तव्य नागपूर. १९८० ते ९० या काळात नागपूर तरुण भारतमध्ये उपसंपादक ते साहित्य संपादक. १९९१ साली युपीएससीच्या माध्यमातून आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी पदावर रुजू. २०१६ साली सहायक संचालकपदी बढती. आकाशवाणीत ३० वर्षे बहुमोल सेवा करून सोलापूर केंद्रावरून सप्टेंबर २०२१ मध्ये सहायक संचालक पदावरून सेवानिवृत्त. औरंगाबाद, जळगाव, नाशिक, मुंबई आणि सोलापूर केंद्रांवर सेवा बजावली. एकूण ८ पुस्तकं प्रकाशित. 'गंधाक्षरे', 'गंधकोवळे ऋतू', 'नवीन काही' हे कवितासंग्रह. 'उदकाचा गर्भ', 'मेघांची पालखी', 'शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर' हे ललित लेखसंग्रह. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेची आस्वादक समीक्षा " हिरव्या बोलीचा बहर", कवितेतील प्रेयस आणि श्रेयसचा वेध घेणारा "निराकाराच्या वाटेवर" हा आस्वादक समीक्षाग्रंथ प्रकाशित. पुरस्कार: गंधाक्षरे कवितासंग्रहासाठी वि. सा. संघाचा पुरस्कार (१९९७), लोकमतचा उत्कृष्ट ललितलेखन पुरस्कार (२००४), पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरचा पुरस्कार (२०१०), मनोरमा साहित्य पुरस्कार (२०१६), मसाप जुळे सोलापूरचा कविवर्य दत्ता हलसगीकर राज्य साहित्य पुरस्कार (२०२०), मसाप सोलापूरचा कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती पुरस्कार (२०२२), 'निराकाराचे यात्रिक' या पुस्तकाला मराठी वाड्.मय मंडळ बडोदा यांचा उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार (२०२५) आणि दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान यांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (२०२५). मौज, हंस, अनुष्टुभ, कवितारती, संस्कृती, लोकमंगल मैत्र, चपराक, शब्दालय, सा. विवेक या नियतकालिकांच्या आणि संचार, महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत, लोकमत इत्यादी अनेक दैनिकांच्या दिवाळी अंकांमध्ये सातत्याने कविता, लेख, मुलाखती प्रकाशित होत असतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या विषयावर पाच पुस्तकांचं लेखन. महाराष्ट्रात विविध ठिकाणी साहित्यिक, सामाजिक, माध्यम क्षेत्रातील विषयांवर व्याख्याने.