प्रोफाइल लोड करत आहे...
सुनंदा विद्यासागर महाजन
अल्प परिचय
सुमारे ३७ वर्षे जर्मन भाषा व साहित्य यांचे अध्यापन करून २०१९मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. या दीर्घ कालावधीत मी वैयक्तिकरित्या व विभागासाठी अनेक संशोधन प्रकल्प राबवले. जर्मनी,ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड येथील विद्यापीठांत संशोधनाची संधी मला मिळाली.
"केल्याने भाषांतर" या भाषांतराला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या १९९९ या वर्षी झालेल्या स्थापनेपासून आत्तापर्यंत मी संपादनात कार्यरत आहे. मी अनेक कथा, कविता, कादंबरी, नाटके अशा साहित्यकृतींचे जर्मनमधून मराठीत भाषांतर केले आहे. आत्तापर्यंत बारा भाषांतरित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. "केल्याने भाषांतर"मध्ये व इतर विविध नियतकालिकांमधून भाषांतरे व इतर लिखाण प्रसिद्ध झाले आहे. मॅक्स म्युलर भवन अर्थात ग्योथे इन्स्टिट्यूटने राबवलेल्या काही भाषांतर प्रकल्पांत मी सहभागी होते.
जर्मन भाषातज्ज्ञ, जर्मन भाषा व साहित्याची- निवृत्त प्राध्यापक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), जर्मन-मराठी भाषांतरकार, "केल्याने भाषांतर" ची संपादक.