Logo
Logo
कौशिक लेले यांचे छायाचित्र

कौशिक लेले

अल्प परिचय

मी कौशिक लेले. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून पुण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. वाचनाची लहानपणापासून आवड आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी वाचलेल्या पुस्तकांचे परिचय/परीक्षण लिहितो. आत्तापर्यंत ३५२ पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत. ती माझ्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ती सगळी पुढील लिंकवर बघू शकाल. https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/ साहित्यसृष्टीच्या वेबसाइटवर पण त्यातील काही समाविष्ट करायला सुरुवात केली आहे. मला स्वतःला भाषा शिकायला शिकवायला आवडतं. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या शिकता यावी online tutorials तयार केली आहेत. त्या माध्यमातून बरेच भारतीय आणि परदेशी लोकही मराठी शिकत आहेत. ही ट्युटोरियल पूर्णपणे मोफत आहेत. ते सर्व कोर्स तुम्ही पुढील लिंकवर बघू शकाल https://learnmarathiwithkaushik.com/ परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी बोलतानाचे व्हिडिओ पुढील प्लेलिस्ट मध्ये बघू शकाल https://youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13QXcm7-vD0LF2AHRd4sRrx सध्या मी चिनी भाषा शिकतो आहे. तिसरी पातळी परीक्षा (HSK3 level) ९३% नी उत्तीर्ण झालो. चौथ्या पातळीची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर मराठीतून चिनी भाषा शिकवणारी "गंमत चिनी भाषेची मराठीतून" ही युट्यूब व्हिडिओ मालिका पण बनवत आहे. त्यात ५०+ व्हिडिओ आहेत. त्याची प्लेलिस्ट लिंक https://youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe मला तमिळ भाषा बोलता येते. तिच्या संपर्कात राहावं, शब्दसंग्रह वाढावा आणि ते करता करता मराठी समाजात भाषिक देवाणघेवाण व्हावी ह्या दृष्टीने तमिळ गाणी मराठीत (देवनागरी लिपीत) आणि त्यांचे अर्थ मराठीत असा उपक्रम करतोय. त्याचीही ३६ गाणी झाली आहेत. ती सर्व गाणी पुढील लिंकवर वाचू शकाल. https://learnmarathiwithkaushik.com/tamil-song-lyrics-meaning-in-marathi/ तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ह्या उपक्रमांना भेट देऊन तुमचा अभिप्राय नक्की कळवा. ते अधिक उपयुक्त होण्यासाठी तुमच्या कल्पना, टीका आणि सूचना ह्यांचेही स्वागतच असेल.